India vs England, 4th T20I : भारतीय संघानं चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात इंग्लंडवर ८ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याच्या अर्धशतकाच्या कामगिरीच्या जोरावर भारतानं ८ बाद १८५ धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडला ८ बाद १७७ धावांवर रोखून टीम इंडियानं मालिकेत २-२ अशी बरोबरी मिळवली. सूर्यकुमार यादवनं ५८ धावांची खेळी केली, तर रिषभ पंत, श्रेयस अय्यर व हार्दिक पांड्या यांनी छोटेखानी खेळी करताना संघाच्य धावसंख्येत योगदान दिले. राहुल चहरननं ३५ धावांत २ आणि हार्दिक पांड्यानं १६ धावांत २ विकेट्स घेतल्या. शार्दूल ठाकूरनं ४२ धावांत ३ विकेट्स घेत सामन्याला कलाटणी दिली. इंग्लंडच्या पराभवामागे रोहित शर्माचं डोकं; शार्दूल ठाकूरला दिला मंत्र अन् टीम इंडियाची बाजी
या सामन्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेरच्या षटकांत विराट कोहलीनं मैदान सोडलं आणि सामन्याची सूत्रे रोहित शर्मानं आपल्या हाती घेतली. विराटनं मैदान का सोडलं, याचे उत्तर मिळाले आहे. ''मी चेंडूच्या मागे धावलो, डाईव्ह मारली आणि चेंडू थ्रो केला. त्यानंतर मी फिल्डींग करण्याच्या पोझिशनमध्ये नव्हतो. म्हणून मी मैदान सोडलं. त्याआधी मी वर्तुळाच्या आत क्षेत्ररक्षण करत होतो आणि शरिराचे तापमान झपाट्यानं कमी झालं, त्यामुळे तुमचे शरीर ताठ होते. माझ्या पायाच्या वरच्या भागात त्रास जाणवू लागला आणि त्याचे रुपांतर दुखापतीत होऊ नये हे मला वाटत होतं. त्यामुळे मी मैदानाबाहेर गेलो.'' विराटचे हे दुखणे गंभीर नसून तो पाचव्या ट्वेंटी-20साठी फिट होईल. 'Soft Signal'वर भडकला विराट कोहली; म्हणाला, अम्पायरकडे I don't know call हा पर्याय का नाही?
अखेरच्या षटकाचा थरार
इंग्लंडला विजयासाठी २३ धावांची गरज असताना जोफ्रा आर्चर व ख्रिस जॉर्डन हे गोलंदाज खेळपट्टीवर होते. शार्दूल ठाकूरच्या पहिल्या चेंडूवर १ धाव घेत जॉर्डननं आर्चरला स्ट्राईक दिली. त्यानंतर आर्चरनं चौकार व षटकार खेचून सामना ३ चेंडूत १२ धावा असा आणला. त्यानंतर शार्दूलनं सलग दोन चेंडू व्हाईड फेकले आणि इंग्लंडला विजयासाठी ३ चेंडूंत १० धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर १ धाव घेतल्यानं जॉर्डन स्ट्राईकवर गेला. पाचव्या चेंडूवर जॉर्डनला बाद करण्यात शार्दूलला यश आलं. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर एकच धाव देत शार्दूलनं सामना जिंकून दिला. Ind Vs Eng 4th T20, Ind Vs Eng 4th T20 Live Score
Web Title: Injury scare? Virat Kohli reveals why he left the field during end overs of riveting India-England 4th T20I
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.