Shahrukh Khan: "इंशाअल्लाह लवकरच बरा होईल, तो फायटर आहे", शाहरुख खानने रिषभ पंतसाठी केली दुआ

Shah Rukh Khan On Rishabh Pant: अपघातात गंभीर जखमी झालेला क्रिकेटपटू ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी शाहरुख खानने प्रार्थना केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 05:32 PM2023-01-04T17:32:31+5:302023-01-04T17:33:35+5:30

whatsapp join usJoin us
Inshallah he will be well soon He is a fighter and a very tough guy Shah Rukh Khan said about Rishabh Pant health | Shahrukh Khan: "इंशाअल्लाह लवकरच बरा होईल, तो फायटर आहे", शाहरुख खानने रिषभ पंतसाठी केली दुआ

Shahrukh Khan: "इंशाअल्लाह लवकरच बरा होईल, तो फायटर आहे", शाहरुख खानने रिषभ पंतसाठी केली दुआ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान सध्या पठाण चित्रपठाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या संदर्भात आज शाहरुख खानने ट्विटरवर AskSRK सत्र सुरू केले. #AskSRK हॅशटॅगसह चाहत्यांनी किंग खानला अनेक प्रश्न विचारले. दरम्यान, एका युजरने शाहरुखला क्रिकेटर ऋषभ पंत लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले. यावर शाहरुख खानने देखील उत्तर दिले आणि मनं जिंकली.

दर्शन शाह नावाच्या युजरने ट्विटरवर शाहरुखला विचारले की, ऋषभ पंत लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना करा. यावर शाहरुख खानने उत्तर देताना म्हटले, "इंशाअल्लाह, तो लवकरच बरा होईल. तो एक फायटर आणि खूप मजबूत आहे."

30 डिसेंबरला झाला होता पंतचा अपघात 
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचा 30 डिसेंबर रोजी रात्री दिल्ली-देहरादून मार्गावर अपघात झाला होता. डिवायडरला धडकल्यानंतर त्याची कार उलटली आणि आग लागली. मात्र, पंतने हिंमत दाखवत उपस्थित लोकांच्या मदतीने वेळीच गाडीतून बाहेर पडण्यात यश मिळवले. 

सर्वप्रथम त्याला अपघातस्थळाजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पंतला देहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, जिथे त्याच्यावर आतापर्यंत उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पंतच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून आता त्याला आयसीयूमधून वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. पण आता बीसीसीआयने रिषभ पंतला देहराडूनहून मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL 2023 मध्ये खेळण्याबाबत शंका
बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका खेळल्यानंतर पंत दुबईला पोहोचला होता. तेथून तो 29 डिसेंबरला दिल्लीला आला आणि तेथून खासगी कारने रुरकी येथील त्याच्या घरी जात होता. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेसाठी पंतचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. आता दुखापतीनंतर पंतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका आणि आयपीएल 2023 मध्ये खेळण्यावर साशंकता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतला पूर्णपणे बरे होण्यासाठी चार ते सहा महिने लागू शकतात.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"   

 

Web Title: Inshallah he will be well soon He is a fighter and a very tough guy Shah Rukh Khan said about Rishabh Pant health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.