Join us  

प्रेरणादायी अफगाणिस्तान! राशिद खानची सेना उपांत्य फेरीसाठी सज्ज 

क्रिकेटमधील अफगाणिस्तान संघाचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 7:09 AM

Open in App

क्रिकेटमधील अफगाणिस्तान संघाचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. युद्धजन्य परिस्थिती असलेला देश टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचतो हे उल्लेखनीय. गतवर्षी वन-डे विश्वचषकापासून अफगाणिस्तानची कामगिरी उंचावत आहे. वन-डे विश्वचषकात थोड्या फरकाने त्यांची उपांत्य फेरी हुकली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांना थोडक्यात पराभव पत्करावा लागला. यंदा त्यांनी ऑस्ट्रेलियाला पराभूत करत स्पर्धेबाहेर केले. 

बांगलादेशविरुद्ध अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात पुनरागमन करून विजय मिळवणे आणि उपांत्य फेरी गाठणे हे जवळपास अशक्य होते. पण, त्यांनी ते करून दाखवले. आता उपांत्य फेरीत अफगाणिस्तानसमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल. दक्षिण आफ्रिका संघ चोकर्स आहेत. त्यामुळे आत्मविश्वासाने मैदानावर उतरून आव्हान स्वीकारण्यास अफगाणिस्तानचे खेळाडू सज्ज असतील. क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची उत्सुकता आहे. शानदार कामगिरी राशिद खान हा या स्पर्धेतील मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडू आहे.

भारत-इंग्लंड दोघांना समान संधीदुसऱ्या उपांत्य सामन्यात भारत विरूद्ध इंग्लंड हे संघ आमनेसामने असतील. दोन्ही संघ तगडे आहेत, माजी जगज्जेते आहेत. रोहित शर्मा, जोस बटलर दोघेही फॉर्मात आहेत. इंग्लंडकडे आदिल राशिद, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन हे फिरकीपटू आहेत. तर भारताकडे कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आहेत. वेगवान गोलंदाजांची फळीही तगडी आहे. दोन्ही संघांमध्ये एवढे साम्य आहे. त्यामुळे दोन्ही संघांना विजयाची समान संधी असेल.

टॅग्स :अफगाणिस्तानट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024