ठळक मुद्दे तो संघातही नव्हता. पण आपल्या देशाने विश्वचषक जिंकायला हवा, अशी त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती होती. त्यामुळे तो संघात पुन्हा परतला.
मुंबई : तो संघातही नव्हता. पण आपल्या देशाने विश्वचषक जिंकायला हवा, अशी त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती होती. त्यामुळे तो संघात पुन्हा परतला. संघाचे कर्णधारपद मिळवले आणि असा काही संघ बांधला की त्यांनी थेट विश्वचषक जिंकला. विश्वचषक जिंकवून दिल्यावर आता तर ते देशाचे पंतप्रधानही झाले आहेत. अशा या जिगरबाज कर्णधाराला आयसीसीने शुभेच्छा दिल्या आहेत.
ही गोष्ट आहे इम्रान खान यांची. पाकिस्तानला त्यांनी १९९२ साली विश्वचषक जिंकवून दिला. पाकिस्तानने १९९२ साली विश्वचषक पटकावला असला तरी यावेळीही त्यांना भारताला पराभूत करता आले नव्हते.