साऊथम्पटन : अवघ्या विश्वाला ढवळून काढणाऱ्या कोरोना विषाणूचे भय संपलेले नसताना चार महिन्यांच्या लॉकडाऊन कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा रुळावर येत असून, पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका आज बुधवारपासून सुरू होत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना साऊथम्पटनच्या ‘द रोज बाऊल’ मैदानावर जैव सुरक्षा वातावरणात रंगणार आहे.या निमित्ताने आयसीसीने क्रिकेट हा खेळ जगभरातील चाहते आणि खेळाडूंसाठी किती महत्त्वाचा आहे, याची महिती सांगणारा व्हिडिओ शेअर केला. ११७ दिवसानंतर नव्या नियमांसह चेंडू आणि बॅटमधील संघर्ष अनुभवायला मिळेल. मैदानावर मात्र थरार अनुभवायला प्रेक्षक असणार नाहीत. टीव्ही स्क्रीनवर मात्र आवडत्या खेळाडूंना लाईव्ह पाहण्याची संधी असेल.खेळाडू प्रेक्षकांचा गोंगाट न अनुभवता कसे खेळतात. पॉझिटिव्ह होणार नाही ना, अशी भीती असताना त्यांची कामगिरी कशी होते, याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष राहील. कोरोनावर ठोस लस आलेली नसतानाही अनेक देशांमध्ये फुटबॉल लीग सर्व नियम पाळून प्रेक्षकांविना सुरूकरण्यात आल्या. मग क्रिकेटनेतरी मागे का राहावे?रखडलेली गाडी सुरू करण्यासाठी आयसीसीने सर्वात प्रथम खेळाडूंना सरावाची परवानगी दिली. काही काळाने स्पर्धेचे पुनरागमन होत आहे. ही मालिका घडवून आणण्यासाठी ईसीबी आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे तसेच दोन्ही संघातील खेळाडूंचे अभिनंदन करायलाच हवे.उभय संघ यातून निवडणारइंग्लंड संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अॅन्डरसन, जोफ्रा आर्चर, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर (उपकर्णधार), जॅक क्राऊली, ज्यो डेनली, ओली पोप, डोम सिब्ली, ख्रिस वोक्स, मार्क वूड.वेस्ट इंडिज संघ : जेसन होल्डर कर्णधार, क्रेग ब्रेथवेट, शाय होप, शेन डॉरिच, रोस्टन चेस, शेमार ब्रूक्स, रहकीम कॉर्नवॉल, एन्कुरमा बोनेर, अल्जारी जोसेफ, चेमार होल्डर, जॉन कँपबेल, रेमॉन रेफर, केमार रोच, जेर्मेन ब्लॅकवूड, शॅनॉन गॅब्रियल.विंडीजकडे पाच दिवस खेळण्याची क्षमता नाही-लाराइंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिज संघात पाच दिवस खेळपट्टीवर तग धरण्याची मुळीच क्षमता नाही, असे मत माजी दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याने व्यक्त केले. बीबीसी स्पोर्ट्सशी बोलताना माजी कर्णधार ५१ वर्षांचा लारा म्हणाला, ‘आमच्याकडे दणकट गोलंदाजी आहे मात्र आमची चिंता भक्कम फलंदाजी हीच आहे. त्यामुळेच मी हे वक्तव्य करीत आहे. इंग्लंडला त्यांच्या भूमीत सहजासहजी पराभूत करता येत नाही. विंडीजने पहिल्या दिवसाच्या खेळापासूनच सामन्यावर नियंत्रण मिळवायला हवे. हा संघ पाच दिवस खेळू शकणार नसल्याने चार दिवसाचा सामना आहे, याच दृष्टिकोनातून खेळ करायला हवा.’होल्डर स्टोक्सच्या तुलनेत सरस ठरेल-सिमन्ससाऊथम्पटन : विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर हा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या तुलनेत पहिल्या कसोटीत वरचढ ठरेल, असा विश्वास विंडीजचे कोच फिल सिमन्स यांनी व्यक्त केला. स्टोक्स हा नियमित कर्णधार ज्यो रुटच्या अनुपस्थितीत कर्णधारपद भूषवणार आहे. पहिल्या सामन्यात दोन अष्टपैलूंमधील लढतीत बेनवर जेसन वरचढ ठरेल, असा मला विश्वास वाटतो. स्टोक्सला नेतृत्वाचा अनुभव नसणे हा मुद्दा नाहीच, कारण त्याला सल्ला देण्यासाठी जेम्स अॅन्डरसन आणि ख्रिस ब्रॉड आहेत,’ असे मत सिमन्स यांनी व्यक्त केले.नव्या बदलांची नांदीआनंद साजरा करण्याची पद्धत: गडी बाद केल्यानंतर किंवा विजयी झाल्यानंतर आता खेळाडू गळाभेट घेऊ शकणार नाहीत. खेळाडंूना एकमेकांच्या पायाला पाय लावावा लागेल.लाळेचा वापर नाही: चेंडूला चकाकी आणण्यासाठी कोरोनामुळे लाळेचा वापर करता येणार नाही.पंच स्वेटर सांभाळणार नाहीत: कोरोनामुळे खेळाडूंना स्वत:चे स्वेटर, गॉगल, कॅप या वस्तू मैदानाबाहेर ठेवाव्या लागतील. आधी या वस्तू पंचांकडे राहायच्या.मैदानावर सॅनिटायझर मशीन: मैदानावर सभोवताल ५० ते ७० ठिकाणी सॅनिटायझर मशीन लावण्यात आल्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका नसतो.चौकार, षटकार रोखतील राखीव खेळाडू: चौकार आणि षटकारामुळे चेंडू सीमारेषेबाहेर जातो. हा चेंडू राखीव खेळाडू ग्लोव्हज घालून स्वत: आणतील.४६ वर्षांत प्रथमच...इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान बुधवारपासून साऊथम्पटनमध्ये सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याने ११७ दिवसानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर गेल्या ४६ वर्षांत प्रथमच १०० पेक्षा अधिक दिवस कुठला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेला नाही.कोविड-१९ महामारीमुळे १५ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प आहे. आता इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान जैव सुरक्षित वातावरणात रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेटला पुन्हा सुरुवात होत आहे. यापूर्वी अखेरचा सामना आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडदरम्यान सिडनीमध्ये वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्याच्या रूपाने खेळल्या गेला होता.वन-डे व त्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या समावेशानंतर मधल्या काळात काही वेळा कसोटी सामने १०० पेक्षा अधिक दिवसाच्या अंतराने खेळल्या गेले, पण इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) व विविध स्थानिक लीगच्या सुरुवातीनंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी असा कालावधी अनुभवाला मिळाला नाही.यापूर्वी १९७२ मध्ये ११४ दिवस आणि १९७३ मध्ये ११३ दिवसापर्यंत कुठला आंतरराष्ट्रीय सामना खेळल्या गेला नव्हता. वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात ५ जानेवारी १९७१ ला झाला होती, पण पहिल्या चार वर्षांत केवळ १५ सामनेच खेळल्या गेले होते. त्यामुळे १९ आॅगस्ट १९७१ ते १६ फेब्रुवारी १९७२ पर्यंत कुठला सामना खेळला गेला नाही. याचा अर्थ १८१ दिवस कुठलाही सामना झाला नव्हता. गेल्या पाच दशकातील दोन सामन्यादरम्यानचे हे सर्वांत जास्त अंतर आहे.जोपर्यंत मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळल्या जात नव्हते तोपर्यंत दोन आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान किंवा कसोटी सामन्यादरम्यान मोठी गॅप असल्याचे दिसत होते. असा मोठा कालावधी पहिल्या व दुसºया महायुद्धादरम्यान अनुभवाला मिळाला. पहिल्या विश्वयुद्धादरम्यान सहा वर्षे, नऊ महिने आणि २० दिवस म्हणजेच एकूण २,४८५ दिवस कुठलाही कसोटी सामना खेळल्या गेला नाही. दुसºया विश्वयुद्धादरम्यान २,४१४ दिवस कुठली लढत झाली नाही.महायुद्धाचा अपवाद वगळला तर १४ आॅगस्ट १८९९ ते १३ डिसेंबर १९०१ पर्यंत म्हणजे ८५१ दिवस कुठलाही कसोटी सामना खेळल्या गेला नाही.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- कोरोना महामारीत इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यात पहिला सामना आजपासून, आंतरराष्ट्रीय क्रिकेट रुळावर
कोरोना महामारीत इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यात पहिला सामना आजपासून, आंतरराष्ट्रीय क्रिकेट रुळावर
कोरोना विषाणूचे भय संपलेले नसताना चार महिन्यांच्या लॉकडाऊन कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा रुळावर येत असून, पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका आज बुधवारपासून सुरू होत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 3:41 AM