Join us  

'यंदा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणं अवघड, त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये IPL 2020 खेळवा'

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) दोन वेळा पुढे ढकलण्यात आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 3:21 PM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. 29 मार्चला सुरू होणारी ही स्पर्धा सुरुवातीला 14 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली होती. पण, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) पुढील सुचना मिळेपर्यंत आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. कोरोनानं जगाला वेठीस धरलं आहे, त्यामुळे जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कपवरही संभ्रम आहे. त्यामुळे आता आयपीएल ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळवा, असा प्रस्ताव समोर येत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) वेळापत्रकानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वर्ल्ड कप होणार आहे. पण, त्यावरही अनिश्चिततेचं सावट आहे. ऑस्ट्रेलिन क्रिकेट मंडळानं रिकाम्या स्टेडियममध्ये स्पर्धा खेळवण्याची तयारी दर्शवली आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅकलमनं ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा होणं अवघड असल्याचं विधान करून त्या कालावधीत आयपीएल खेळवण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे.  कोलकाता नाइट रायडर्सचा प्रशिक्षक मॅकलम म्हणाला,''ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल खेळवायला हवं. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलायला हवी.''

ट्वेंटी -20 वर्ल्ड कप पुढे ढकलल्यास 2021मध्ये होणाऱ्या महिलांच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या वेळापत्रकातही बदल केला जाऊ शकतो. ''कोरोना व्हायरसच्या संकटात 16 आंतरराष्ट्रीय संघ आणि त्यांचे सहाय्यक कर्मचारी, ब्रॉडकास्टर या सर्वांना ऑस्ट्रेलियात प्रवास करणे अवघड होईल. त्यामुळे बंद दरवाजातही ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होईल, याची शक्यता कमीच आहे.  2021मध्ये वर्ल्ड कपसाठी वेळापत्रक तयार केले जाऊ शकते. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल खेळवावे. त्यासाठी काही मोजक्याच परदेशी खेळाडूंना प्रवास करावा लागेल. ब्रॉडकास्टर भारतातीलच आहे. त्यामुळे आयपीएल खेळवण्यात काहीच अडचण होणार नाही,''असे मॅकलम म्हणाला.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Arnab Goswami यांच्या समर्थनात कुस्तीपटू बबिता फोगाट आखाड्यात; म्हणाली...

पाकिस्तानी फलंदाज देशासाठी खेळतात, भारतीय स्वतःसाठी; पाकचा माजी कर्णधार बरळला

मोठा निर्णय : 'युनिव्हर्स बॉस' Chris Gayleच्या मदतीला किंग्स इलेव्हन पंजाब धावला

'Sex Video'मुळे महिला खेळाडूचं आयुष्य झालं होतं उद्ध्वस्त; तीन दिवस घरातच होता मृतदेह

CSKनं MS Dhoniची निवड केल्यानं मोठा धक्का बसला; दिनेश कार्तिकनं व्यक्त केली खंत

Video : टीम इंडियाच्या कर्णधाराचं 'Magic'; बघा तुम्हाला जमतंय का?

टॅग्स :आयपीएल 2020आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020ब्रेन्डन मॅक्युलम