संजू सॅमसनची मैदानावर आतषबाजी...पण, त्याच्यावरून गौतम गंभीर-शशी थरूर यांच्यात रंगली जुगलबंदी

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals)ने किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab)वर रोमहर्षक विजय मिळवला

By स्वदेश घाणेकर | Published: September 28, 2020 03:11 PM2020-09-28T15:11:43+5:302020-09-28T15:12:39+5:30

whatsapp join usJoin us
IPL 13: Shashi Tharoor says Sanju Samson is 'the next MS Dhoni' of Indian cricket; Gautam Gambhir disagrees | संजू सॅमसनची मैदानावर आतषबाजी...पण, त्याच्यावरून गौतम गंभीर-शशी थरूर यांच्यात रंगली जुगलबंदी

संजू सॅमसनची मैदानावर आतषबाजी...पण, त्याच्यावरून गौतम गंभीर-शशी थरूर यांच्यात रंगली जुगलबंदी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

RR vs KXIP Latest News : Indian Premier League ( IPL 2020) राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals)ने किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab)वर रोमहर्षक विजय मिळवला. KXIPच्या 223 धावांचे आव्हान RRला पेलवणार नाही, असेच वाटत होते. पण, शारजाहच्या खेळपट्टीवर चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह थरार अनुभवायला मिळाला नाही तर नवलच. राजस्थान रॉयल्सनं ( RR) 224 धावांचे लक्ष्य पार करून इतिहास रचला. या सामन्यात 85 धावा करणाऱ्या संजू सॅमसनला ( Sanju Samson) मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. संजू सॅमनच्या मैदानावरील फटकेबाजीनंतर सोशल मीडियावर काँग्रेस नेते शशी थरूर ( Shashi Tharoor) आणि भाजपा खासदार गौतम गंभीर ( Gautam Gambhir) यांच्यात जुंपली. 

Rahul Tewatia आहे तरी कोण?; क्षणात Zeroचा Hero झाला, ट्रोल करणाऱ्या नेटिझन्सनी नंतर डोक्यावर घेतले!

मयांक अग्रवालचे ( Mayank Agarwal) IPL मधील पहिले शतक अन् लोकेश राहुलचा ( KL Rahul) सातत्यपूर्ण खेळ याच्या जोरावर KXIPनं 20 षटकांत 2 बाद 223 धावांचा डोंगर उभा केला. मयांक अग्रवालनं ( Mayank Agarwal) 50 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकारांसह 106 धावा चोपल्या. लोकेश राहुलने ( KL Rahul) 54 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार खेचून 69 धावा केल्या.  लक्ष्याचा पाठलाग करताना  राजस्थान रॉयल्सकडून ( RR) सडेतोड उत्तर मिळाले. स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) आणि संजू सॅमसननं ( Sanju Samson) यांनीही षटकारांचा पाऊस पाडला.  स्मिथनं 27 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 50 धावा केल्या. सॅमसन 42 चेंडूंत 4 चौकार व 7 षटकार करून 85 धावांवर माघारी परतला. राहुल टेवाटियानं ( Rahul Tewatia) 31 चेंडूंत 7 षटकारांसह 53 धावा करताना राजस्थानचा विजय पक्का केला. 

संजू सॅमसनचा डाएट प्लान कुणी मला सांगेल का? आनंद महिंद्रा यांचं ट्विट व्हायरल 

राहुल टेवाटियाचे एका षटकात पाच खणखणीत Six; ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी, Video 

संजू सॅमसनच्या फटकेबाजीचे कौतुक करताना शशी थरूर यांनी ट्विट केलं की,''राजस्थान रॉयल्सनं अविश्वसनीय विजय मिळवला. संजू सॅमसनला मी दशकापासून ओळखत आहे आणि तो 14 वर्षांचा असताना मी त्याला सांगितले होते की तू पुढचा महेंद्रसिंग धोनी होशील. तो दिवस आज उजाडला आहे. IPLमध्ये सलग दोन सामन्यांत अफलातून खेळ केल्यानंतर वर्ल्ड क्लास खेळाडू दाखल झालाय, हे सर्वांना कळलं.'' 


भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानं थरूर यांच्या Next MS Dhoni या विधानावर आक्षेप घेतला. त्यानं त्यांना प्रत्युत्तर दिले की,''संजू सॅमसनला कुणाचा पुढचा होण्याची गरज नाही. तो भारतीय क्रिकेटमधील एकमेव संजू सॅमसन आहे.'' 

यापूर्वी, चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) विरुद्धच्या सामन्यात संजूनं 32 सामन्यांत 74 धावा केल्या होत्या. तेव्हा गंभीरनं भारतीय निवड समितीवर टीका केली होती. तो म्हणाला होता की,''भारताच्या अंतिम 11 खेळाडूमध्ये संजू सॅमसनला संधी मिळत नाही, याचे आश्चर्य वाटते'' 
 

राजस्थान रॉयल्सच्या थरारक विजयाचा 'मॅजिकल' क्षण; अनुभवा एका क्लिकवर! 

 राजस्थान रॉयल्सच्या ऐतिहासिक विजयानंतर Point Tableमध्ये मोठे फेरबदल!

Web Title: IPL 13: Shashi Tharoor says Sanju Samson is 'the next MS Dhoni' of Indian cricket; Gautam Gambhir disagrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.