Join us

IPL 2018 : ' या ' कलाकारांचा उद्घाटन सोहळ्यात पाहायला मिळणार जलवा

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचे बजेट कमी झालं असलं तरी ' हे ' कलाकार आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवणार आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 19:26 IST

Open in App
ठळक मुद्देहा सोहळा सायंकाळी सहा वाजता सुरु होणार असून 7 वाजून 15 मिनिटांपर्यंत हा सोहळा चालणार आहे. पण या सोहळ्यात नेमके काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

मुंबई : आयपीएल आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पण स्पर्धेपूर्वी साऱ्यांना उत्सुकता आहे ती आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याची. आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याचे बजेट कमी झालं असलं तरी ' हे ' कलाकार आयपीएलमध्ये आपला जलवा दाखवणार आहेत. 

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सात एप्रिलला आयपीएलचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. हा सोहळा सायंकाळी सहा वाजता सुरु होणार असून 7 वाजून 15 मिनिटांपर्यंत हा सोहळा चालणार आहे. पण या सोहळ्यात नेमके काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात यावर्षी बॉलीवूडचा स्टार हृतिक रोशन आणि जगविख्यात नृत्यदिग्दर्शक प्रभुदेवा यांची खास अदाकारी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर बॉलीवूडमधील वरुण धवन, परिणीती चोप्रा आणि जॅकलिन फर्नांडीस यांचा नृत्याविष्कार पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :आयपीएल 2018हृतिक रोशनप्रभू देवा