इस्लामाबाद- इंग्लंड आणि आयर्लंड दौ-यावर जाण्यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेट संघाला शनिवारी वाघा बॉर्डरवर नेण्यात आलं होतं. त्यावेळी पाकिस्तानी गोलंदाज हसन अली यानं भारतीय जवानांकडे पाहून आक्षेपार्ह अंदाजात हावभाव केले. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. त्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल झालाय. इंग्लंड आणि आयर्लंड दौ-यावर जाण्यापूर्वी पाकिस्तानी क्रिकेट संघाचा ट्रेनिंग कॅम्प सुरू होता.
कॅम्पच्या शेवटच्या दिवशी संघाला वाघा बॉर्डरवर नेण्यात आलं होतं. वाघा बॉर्डरवर भारत आणि पाकिस्तानकडून परेड सुरू असतानाच अचानक हसन अलीनं विकेट घेण्याच्या अंदाजात भारतीय जवानांकडे पाहून हावभाव केले. बळी मिळवल्यानंतर जसा आनंद साजरा केला जातो, तसेच हावभाव तो भारतीय जवानांकडे पाहून करत होता. यावेळी भारतीय जवानांकडे पाहून हसन अली जोरजोरात ओरडत होता. आता हा व्हिडीओ पाकिस्तान आणि भारतातही व्हायरल झाला.
पाकिस्तानातल्या काही लोकांनी हसन अलीचं कौतुक केलंय, तर काहींनी त्याची खिल्ली उडवली. भारतीय युझर्सनं हसन अलीला कार्टून असं संबोधलं आहे. काहीही केलंस तरी हसन तुला आयपीएलमध्ये खेळता येणार नाही, असंही एका भारतीय युझर्सनं म्हटलं आहे. बीएसएफने पाकिस्तानी गोलंदाज हसन अलीच्या या कार्टूनगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. परेडमध्ये केवळ जवानाच सहभागी होऊ शकतात, ति-हाईताला त्यात सहभाग घेता येत नाही, असंही बीएसएफचे अधिकारी मुकुल गोयल म्हणाले आहेत.
Web Title: ipl 2018 cricketer hasan ali wagha border indian army troll at twitter
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.