दिल्लीपुढे राजस्थानचे ‘रॉयल’ आव्हान

यंदाच्या सत्रात आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी उर्वरित ६ सामने जिंकणे अनिवार्य असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघापुढे बुधवारी घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचे कडवे आव्हान असेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 12:56 AM2018-05-02T00:56:39+5:302018-05-02T00:56:39+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2018, DD vs RR Match Prediction: Who will win today's match between Delhi Daredevils and Rajasthan Royals | दिल्लीपुढे राजस्थानचे ‘रॉयल’ आव्हान

दिल्लीपुढे राजस्थानचे ‘रॉयल’ आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : यंदाच्या सत्रात आपले आव्हान टिकवून ठेवण्यासाठी उर्वरित ६ सामने जिंकणे अनिवार्य असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघापुढे बुधवारी घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सचे कडवे आव्हान असेल. दिल्ली सध्या गुणतालित ४ गुणांसह तळाच्या स्थानी असून, राजस्थान ६ गुणांसह पाचव्या स्थानी आहे.
फिरोझशाह कोटला स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दिल्लीची फलंदाजी गेल्या दोन सामन्यांत चांगलीच बहरली आहे. दिल्लीने यंदा केवळ दोन विजय मिळविले असून, त्यांनी अनुक्रमे कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सला नमविले आहे. निराशाजनक कामगिरीमुळे गौतम गंभीरने संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर युवा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरकडे संघाची धुरा सोपविण्यात आली. गेल्या दोन सामन्यांत दिल्लीच्या फलंदाजांनी धुवाधार फटकेबाजी करत चांगली कामगिरी केली. कोलकाताविरुद्ध त्यांनी दोनशेची मजल मारत शानदार विजय मिळविला. तसेच गतसामन्यात चेन्नईच्या २१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला १३ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे फलंदाज जरी बहरात असले, तरी गोलंदाजांची कामगिरी सुधारण्याचे आव्हान दिल्लीपुढे असेल.
ऋषभ पंत, कर्णधार श्रेयस अय्यर यांनी चांगली कामगिरी केली असून, युवा पृथ्वी शॉ, कॉलिन मुन्रो, अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यांच्याकडूनही संघाला अधिक अपेक्षा आहेत. त्याचप्रमाणे, दिल्लीचा वेगवान गोलंदाज टेÑंट बोल्ट सर्वाधिक बळी घेण्याºयांच्या यादीत दुसºया स्थानी असून, त्याला अद्याप इतर गोलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळालेली नाही.
दुसरीकडे, दिल्लीच्या तुलनेत चांगली कामगिरी केलेल्या राजस्थानला या सामन्यात विजयाची अपेक्षा असेल. गेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १५२ धावांचा पाठलाग करताना आलेले अपयश राजस्थानला सलत असेल. कर्णधार अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन, जोस बटलर, हेन्रिक क्लासेन यांच्यावर फलंदाजीची मदार असली तरी अष्टपैलू बेन स्टोक्सचे अपयश राजस्थानसाठी चिंतेची बाब आहे. गोलंदाजीतही जयदेव उनाडकटकडून राजस्थानला मोठ्या अपेक्षा आहेत. स्टार खेळाडूंची संघात कमतरता असली, तरी राजस्थानमध्ये कोणालाही धक्का देण्याची क्षमता असल्याने दिल्लीला घरच्या मैदानावर सावधपणे खेळावे लागेल.
 

Web Title: IPL 2018, DD vs RR Match Prediction: Who will win today's match between Delhi Daredevils and Rajasthan Royals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.