Join us  

नवरा असावा तर असा... साक्षी म्हणाली एक सिक्स और, धोनीने धाडला चेंडू सीमापार!

बंगळुरुविरोधात झालेल्या सामन्यात धोनीने षटकार मारत आपल्या स्टाईलने चेन्नईवा विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 3:48 PM

Open in App

बंगळुरु - बंगळुरुविरोधात झालेल्या सामन्यात धोनीने षटकार मारत आपल्या स्टाईलने चेन्नईवा विजय मिळवून दिला. 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धोनीने 34 चेंडूमध्ये 7 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 70 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.  20 व्या षटकांत कोरी अँडरसनच्या चौथ्या चेंडूवर षटकार खेचत धोनीनं चेन्नईला पाच विकेटने विजय मिळवून दिला. या षटकारांमुळे त्याचे चाहते आणि स्टेडियममध्ये हजर असलेली त्याची पत्नी साक्षीचा आनंद गगनात मावत नव्हाता. धोनीने आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.  धोनीच्या प्रत्येक षटकाराला साक्षी दाद देत होती आणि त्याचा उत्साह वाढवताना दिसत होती. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हारल झाला आहे. हा व्हिडीओ चेन्नईच्या 18 व्या षटकातील आहे.

 

यामध्ये साक्षी धोनीला षटकार मारण्यासाठी सांगत असल्याची दिसत आहे. मोहमद्द सिराडच्या या षटकाच्या अखेरच्या चेंडूला धोनीने सीमापार पाठवले. या षटकारानंतर साक्षी धोनीला आणखी एक षटकार मारण्याचा इशारा करत असल्याचे दिसत आहे.

 

दुसरीकडे अनुष्का धोनीच्या या षटकारानंतर नाखूश दिसत होती. धोनी-विराटच्या पत्नीशिवाय सुरेश रैनाची पत्नी प्रियंका आणि इमरान ताहिरची पत्नी  सुम्मैया दिलदारही उपस्थित होत्या. 

 

चेन्नईचा विजय -

काल झालेल्या सामन्यात धोनीनं पुन्हा एका आपण बेस्ट फिनिशर असल्याचे दाखवून दिले.  34 चेंडूत सात षटकारांची आतषबाजी करत धोनीनं 74 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.  चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना धोनीने गाजवला. चेन्नईनं या सामन्यात बंगळुरुवर पाच विकेट्स आणि दोन चेंडू राखून मात केली. या सामन्यात बंगळुरुने चेन्नईला विजयासाठी 206 धावांचे आव्हान दिले होते. धोनी आणि रायुडूच्या धमाकेदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने विजय खेचून आणला. 

विजयानंतर काय म्हणाला धोनी -

सामना संपल्यानंतर अप्रत्यक्षरित्या विराट कोहलीला यशाचा मंत्रच सांगितला आहे. धोनी सामन्यानंतर म्हणाला की, आपल्या डोक्यात किती षटके बाकी राहिली आहेत हे प्रत्येकवेळा असले पाहिजे. डेथ ओव्हरमध्ये कोण गोलंदाजी करणार? त्याचप्रमाणे आपण ज्या गोलंदाजाच्या हातात चेंडू देत आहे तो खेळपट्टीवर  चांगली गोलंदाजी करु शकतो याचा अंदाज बांधने तितकेच महत्वाचे आहे. खेळामध्ये जय आणि पराभव असतोच. पण आपण निर्णय कसा घेतो त्यावरही सामन्याचा निकाल अवलंबून असतो असे धोनीने सामन्यानंतर सांगितले.