ठळक मुद्देयंदाच्या आयपीएलची सुरुवात झाली तेव्हा आपण भावुक झालो असल्याचे दस्तुरखुद्द धोनीनेच सांगितले आहे.
मुंबई : दोन वर्षांनी चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने आयपीएलमध्ये पुनरागमन केले आणि थेट अंतिम फेरी गाठली. हे आयपीएल जसे चेन्नईसाठी खास होते, तसेच ते कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठीही. कारण गेल्यावर्षी पुण्याच्या संघाने धोनीला नेतृत्व करण्याची संधी दिली नव्हती. पण यावर्षी चेन्नईचा संघ आयपीएलमध्ये परतला आणि धोनीला पुन्हा एकदा कर्णधारपद भूषवायला मिळाले. धोनीच्या चेहऱ्यावर आपल्याला कसलेच भाव दिसत नाही, पण हाच धोनी भावुक होत असेल का? असा प्रश्नदेखील आपल्याला पडतो. पण यंदाच्या आयपीएलची सुरुवात झाली तेव्हा आपण भावुक झालो असल्याचे दस्तुरखुद्द धोनीनेच सांगितले आहे.
" दोन वर्षांनी चेन्नईचा संघ यावेळी आयपीएलमध्ये परतला. त्यामुळे दोन वर्षांनी पुन्हा एकदा चेन्नई कडून खेळत असताना मी भावुक झालो होतो. एक गोष्ट दुर्देवी घडली की आम्हाला चेन्नईमध्ये जास्त सामने खेळता आले नाही. पण एक सामना आम्ही चेन्नईला खेळलो, हेही नसे थोडके. आम्ही एका सामन्यात तरी घरच्या मैदानात चाहत्यांसमोर खेळू शकलो, याचा आनंद आहे. "
Web Title: IPL 2018: Dhoni starts feeling emotionally at the start of this year's IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.