मुंबई – सात एप्रिलपासून आयपीएलच्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे. आठ संघातील खेळाडू तयारीला लागले आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, धोनीसह अनेक दिग्गज खेळाडू नेटमध्ये घाम गाळत आहेत. युवा खेळाडूही आपला जलवा दाखवण्यासाठी तयार आहेत. गेल्या वर्षभर भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडण्याऱ्या युवा कुलदीप यादवने भारताच्या आजी-माजी कर्णधारांना चॅलेंज केलं आहे.
अप्रत्यक्षपणे कुलदीपने बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली आणि चेन्नईचा कर्णधार एम.एस. धोनीला आपण बाद करु असे म्हणत चॅलेंज केले आहे. कुलदीप यादावला कोलकाता संघाने राइट टू मॅच कार्डचा वापर करत 5.8 कोटींमध्ये खरेदी केलं आहे.
23 वर्षीय कुलदीप यादवने 2016 आणि 2017 च्या आयपीएल सत्रात 15 सामने खेळले आहे. या 15 सामन्यात त्यानं 18 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमधील त्याची ही कामगिरी आणि गेल्यावर्षभरात त्यानं केलेली कामगिरी पाहता आयपीएलच्या आकड्यावर विश्वास बसत नाही. पण अनुभवातुन कुलदीप खूप काही शिकला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये कुलदीपने उत्कृष्ट कामिगरी केली होती. म्हणूनच दक्षिण आफ्रिका आणि निदाहास चषकानंतर आत्मविश्वास वाढलेल्या कुलदीपने रनमशीन विराट कोहली आणि धोनीला चॅलेंज केलं आहे.
माध्यमांशी बोलताना कुलदीप म्हणाला की, यंदाच्या आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. विराट कोहली आणि धोनी यांना लवकर बाद करेन. विराट कोहली आणि धोनी हे दोघेही फिरकी गोलंदाजी चांगली खेळतात. त्यांना बाद करणे माझ्यापुढे मोठं चॅलेंज असेल. या दोन्ही दिग्गजांविरोधात मी प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार मी त्यांना बाद करण्याचा प्रयत्न करेल.
Web Title: IPL 2018 : Dismissing Virat Kohli and MS Dhoni on My Bucket List This IPL: Kuldeep Yadav
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.