ठळक मुद्देवानखेडेवर जवळपास तीस हजार प्रेक्षकांच्या साथीने रंगणार आहे तो आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील आयपीएलचा अंतिम सामना.
चेन्नईने विजयाचा आनंद कसा केला साजरा... पाहा व्हीडीओ
चेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद
मुंबई : आयपीएलच्या अंतिम फेरीत वानखेडेवर फटक्यांचं तुफान आणलं ते चेन्नई सुपर किंग्जच्या शेन वॉटसनने. धडाकेबाज फटकेबाजी करत वॉटसनने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अंतिम फेरीत शतक झळकावले आणि चेन्नईने आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली. वॉटसनने 57 चेंडूंत 11 चौकार आणि आठ षटकारांच्या जोरावर नाबाद 117 धावांची दमदार खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर चेन्नईने अंतिम फेरीत हैदराबादवर आठ विकेट्स राखून विजय मिळवला. चेन्नईचे हे आयपीएलमधले तिसरे जेतेपद ठरले. यापूर्वी 2010 आणि 2011 साली चेन्नईने आयपीएलचे जेतेपद पटकावले.
10.28 PM : शेन वॉटसनचे 51 चेंडूंत शतक पूर्ण
10.14 PM : सुरेश रैना OUT; चेन्नईला दुसरा धक्का
10. 11 PM : 'वॉटसन'सनाटी.... शेन वॉटसनने केली षटकारांची हॅट्ट्रिक
9.58 PM : शेन वॉटसनचे षटकारासह अर्धशतक
9.38 PM : चेन्नईने सातव्या षटकात लूटल्या 16 धावा
9.33 PM : चेन्नईच्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये 35 धावा
9.22 PM : चेन्नईला पहिला धक्का; फॅफ ड्यू प्लेसिस OUT
9.08 PM : भुवनेश्वर कुमारचे पहिलेच षटक निर्धाव
पहिल्या डावातील काही महत्त्वाचे क्षण, पाहा फोटोंच्या माध्यमातून
विजयासाठी हैदराबादचे चेन्नईपुढे 179 धावांचे आव्हान
मुंबई : केन विल्यम्सन आणि युसूफ पठाण यांच्या दमदार खेळींच्या जोरावर आयपीएलच्या अंतिम सामन्यात हैदराबादला चेन्नईपुढे 179 धावांचे आव्हान ठेवता आले. केन विल्यम्सनने 36 चेंडूंत 47 धावांची खेळी साकारली. केन बाद झाल्यावर आतापर्यंत फॉर्मात नसलेल्या युसूफ पठाणने धमाकेदार फटकेबाजी केली. पठाणने 25 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 45 धावा केल्या. हैदराबादच्या कार्लोस ब्रेथवेटने तीन षटकारांच्या जरावर 11 चेंडूंत 21 धावा करत हैदराबादची धावसंख्या फुगवली.
8.47 PM : चेन्नईविरुद्ध हैदराबादच्या 178 धावा
8.34 PM : ब्रेथवेटच्या षटकारासह हैदराबादच्या दीडशे धावा पूर्ण
8.30 PM :दीपक हुडा OUT; हैदराबादला पाचवा धक्का
7.23 PM : सुरेश रैनाचा अप्रतिम झेल, शकिब अल हसन बाद
केन विल्यम्सनला बाद केल्यावर चेन्नईच्या संघाने असा आनंद साजरा केला, पाहा हा फोटो...
8.05 PM :केन विल्यम्सन OUT; हैदराबादला मोठा धक्का
8.02 PM : केन विल्यम्सनचे सलग दोन चौकार
- केन विल्यम्सनने चेन्नईच्या ड्वेन ब्राव्होच्या बाराव्या षटकात सलग दोन चैकार लगावले.
7.54 PM: हैदराबाद 10 षटकांत 2 बाद 73
7.47 PM : शिखर धवन OUT; हैदराबादला दुसरा धक्का
7.40 PM : हैदराबाद आठ षटकांत 1 बाद 62
वानखेडेवर धोनीला चाहत्यांचा जोरदार पाठिंबा, पाहा हा फोटो...
7.16 PM : हैदराबाद दोन षटकांनंतर 1 बाद 17
7.09 PM : हैदरबादला पहिला धक्का; श्रीवत्स गोस्वामी OUT
7.05 PM : पहिल्या षटकात हैदराबाद बिनबाद 6
धोनी आणि विल्यम्सन यांनी चषकासह अशी दिली खास पोझ... पाहा हा फोटो
7.01 PM : चेन्नईची झाली नो बॉलने सुरुवात
6.30 PM : चेन्नईने नाणेफेक जिंकून हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले
धोनी आणि विल्यम्सन या दोन कॅप्टन कूलमध्ये रंगणार अंतिम सामना
मुंबई : वानखेडेवर जवळपास तीस हजार प्रेक्षकांच्या साथीने रंगणार आहे तो आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील आयपीएलचा अंतिम सामना. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने ' क्वालिफार - 1 ' मध्ये सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत अंतिम फेरीत स्थान पटकावले होते. हैदराबादने या पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्सला ' एलिमिनेटर' मध्ये पराभूत करत अंतिम फेरीतील स्थान पक्के केले होते. यापूर्वी झालेल्या या दोन्ही संघांतील लढती चांगल्याच रंजक झाल्या होत्या. या अंतिम फेरीत चेन्नईचा महेंद्रसिंग धोनी आणि केन विल्यम्सन या दोन्ही ' कॅप्टन कूल' मध्ये अंतिम फेरीची लढत रंगणार आहे. त्यामुळे आयपीएलच्या या अंतिम फेरीच्या सामन्यात चेन्नई बाजी मारते की हैदराबादचा संघ जेतेपदाला गवसणी घालतो हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
दोन्ही संघ
चेन्नई आणि हैदराबादच्या संघांचे वानखेडेवर आगमन... पाहा हा व्हीडीओ
Web Title: IPL 2018 Final, CSK vs SRH Live Cricket Score Updates
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.