मुंबई: महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपरकिंग्ज आणि केन विल्यम्सनचा हैदराबाद सनरायझर्स हे दोन तुल्यबळ संघ आज IPL 2018 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. आजच्या अंतिम सामन्यानंतर या स्पर्धेतील ऑरेंज कॅपचा मानकरी कोण असेल, हेदेखील स्पष्ट होईल. यामुळे केन विल्यम्सन आणि अंबाती रायडू या दोन खेळाडुंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, स्पर्धेतील आतापर्यंतची आकडेवारी पाहता केन विल्यम्सनच ऑरेंज कॅपचा मानकरी ठरणार असल्याचे दिसत आहे. केन विल्यम्सनने 17 सामन्यांमध्ये (अंतिम सामन्यातील ताजी आकडेवारी ग्राह्य धरता) मिळून एकूण 733 धावा केल्या आहेत. तर अंबाती रायडूच्या खात्यावर 586 धावा जमा आहेत. याचा अर्थ रायडू विल्यम्सनपेक्षा 147 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे एखादा चमत्कार झाला तरच अंबाती रायडू केन विल्यम्सनला पाठी टाकू शकतो. मात्र, केन विल्यम्सनचा सध्याचा फॉर्म पाहता ही शक्यता फारच कमी आहे. केन विल्यम्सनने या स्पर्धेत आतापर्यंत 8 अर्धशतकं झळकावली आहेत. त्याने केलेल्या 733 धावांमध्ये यामध्ये 63 चौकार आणि 28 षटकारांचा समावेश आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- मॅचचा निकाल काहीही लागो, जिंकणार विल्यम्सनच
मॅचचा निकाल काहीही लागो, जिंकणार विल्यम्सनच
केन विल्यम्सनने या स्पर्धेत आतापर्यंत 8 अर्धशतकं झळकावली आहेत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 8:19 PM