Join us  

हा योगायोग पाहिलात का? युसूफ पठाणची या दोन सामन्यांत निर्णायक खेळी

या मोसमात त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2018 9:07 PM

Open in App

मुंबई: मोक्याच्या क्षणी संघाच्या मदतीला धावून येणारा खेळाडू या विशेषणाला युसूफ पठाण पुन्हा एकदा जागला. IPL 2018 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युसूफ पठाणने 25 चेंडूत 45 धावांची निर्णायक खेळी केली. युसूफ पठाण आणि केन विल्यम्सन या दोघांच्या खेळीच्या जोरावर हैदराबाद सनराझर्सने चेन्नईपुढे विजयासाठी 179 धावांचे तगडे आव्हान उभे केले आहे. केन विल्यम्सन बाद झाल्यानंतर हैदराबादचा डाव कोसळणार असे वाटत होते. मात्र, युसूफ पठाणने एक बाजू लावून धरली. यंदाच्या  IPL 2018 स्पर्धेत युसूफ पठाणला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. या मोसमात त्याला एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. इतर सामन्यांतील कामगिरीचा विचार करता त्याच्या धावांची सरासरी केवळ 20च्या आसपास राहिली आहे. अपवाद आहे तो फक्त साखळी फेरीत घरच्या मैदानावर चेन्नईविरुद्ध झालेल्या सामन्यात. त्या सामन्यात युसूफ पठाणने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध 45 धावा फटकावल्या होत्या. यापूर्वी 2007 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेत कर्णधार धोनीने युसूफ पठाणला केवळ अंतिम सामन्यासाठीच संघात घेतले होते. त्यावेळीही 'बिग मॅच प्लेयर' ही ओळख युसूफ पठाणसाठी फायदेशीर ठरली होती.

टॅग्स :आयपीएल 2018युसुफ पठाण