नवी दिल्ली : आयपीएलमध्ये बरेच विक्रम घडत असतात. पण काही गोष्टी आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाही घडतात. अशीच एक गोष्ट आयपीएलच्या इतिहासात बुधवारी पहिल्यांदाच घडली. काय आहे ही गोष्ट ते जाणून घ्या.
इडन गार्डन्सवर बुधवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये आयपीएलचा सामना झाला. या सामन्यात मुंबईने कोलकात्यावर 102 धावांनी मोठा विजय मिळवला. आतापर्यंतच्या 22 सामन्यांमध्ये मुंबईने कोलकात्यावर 18 वेळा विजय मिळवला आहे. कोलकात्याला 2015 सालानंतर एकदाही मुंबईवर विजय मिळवता आलेला नाही. ही गोष्ट आयपीएलमध्ये यापूर्वी कधीही घडलेली नाही.
कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात इशान किशनच्या 62 धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 210 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचा डाव 102 धावांत संपुष्टात आला होता. हा मुंबईने केलेला कोलकात्याचा सर्वात मोठा पराभव आहे. आतापर्यंतचे कोलकात्याचे केलेले काही मोठे पराभव पाहा.
धावांचे अंतर प्रतिस्पर्धी मैदान वर्ष102 धावा मुंबई इडन गार्डन्स 2018
92 धावा मुंबई पोर्ट एलिजाबेथ 2009
65 धावा मुंबई वानखेड़े 2013
55 धावा चेन्नई इडन गार्डन्स 2010
55 धावा दिल्ली फिरोजशाह कोटला 2018