ठळक मुद्देअंतिम फेरीत 24 धावा देत रशिदला एकही बळी मिळवता आला नाही.
मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादला पराभूत करत जेतेपद पटकावले. चेन्नईचे आतापर्यंतचे हे तिसरे जेतेपद होते. कोणत्या पाच गोष्टींमुळे चेन्नईला यंदाच्या आयपीएलमध्ये विजय मिळाला ते आपण पाहूया....
1. चहार आणि एनगिडी यांचा पॉवर-प्लेमध्ये भेदक मारा
- चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय लुंगी एनगिडी आणि दीपक चहार यांनी पहिल्या पॉवर-प्लेमध्ये भेदक मारा केला. त्यामुळे हैदराबादच्या फलंदाजांना पहिल्या पॉवर-प्लेमध्ये जास्त धावा जमवता आल्या नाहीत. पहिल्या पॉवर-प्लेमध्ये हैदराबादला 42 धावांवर समाधान मानावे लागले.
2. हरभजनऐवजी कर्ण शर्माला दिलेली संधी
- धोनीने जेव्हा हरभजनला वगळून कर्णला खेळवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा हा निर्णय बऱ्याच जणांना खटकला होता. पण धोनीचा हा निर्णय योग्य असल्याचे तेव्हा दिसून आले जेव्हा कर्णने हैदराबादचा कर्णधार आणि आयपीएलमधील सर्वाधिक धावा करणाऱ्या केन विल्यम्सनला बाद केले.
3. शेन वॉटसनचे धडाकेबाज शतक
- शेन वॉटसनने आपल्या शतकाच्या जोरावर चेन्नईला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. वॉटसनने आपल्या डावाची सुरुवात संथपणे केला. पहिल्या 10 चेंडूंमध्ये त्याला एकही धाव करता आली नाही. पण त्यानंतर 51 चेंडूंमध्ये वॉटसनने शतक पूर्ण करत चेन्नईला सहज विजय मिळवून दिला.
4. वॉटसन आणि रैनाची भागीदारी
- वॉटसन एका बाजूने आक्रमक फलंदाजी करत असला तरी त्याला सुरेश रैनाची चांगली साथ लाभली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 51 चेंडूंत 117 धावांची भागीदारी रचली, त्यामुळे चेन्नईचा विजय सुकर झाला. वॉटसनने नाबाद 117 आणि रैनाने 32 धावांची खेळी साकारली.
5. रशिद खानला एकही बळी नाही
- यंदाच्या आयपीएलमध्ये हैदराबादचा फिरकीपटू रशिद खान हा चांगल्या फॉर्मात होता. अंतिम सामन्यापूर्वी झालेल्या ' क्वालिफार-2 'च्या लढतीमध्ये रशिदने 10 चेंडूंत नाबाद 34 धावांची खेळी साकारली होती. त्याचबरोबर तीन बळी त्याने मिळवले होते. त्यामुळे अंतिम फेरीत रशिद हा हैदराबादचा हुकमी एक्का आहे, असे समजले जात होते. पण अंतिम फेरीत 24 धावा देत रशिदला एकही बळी मिळवता आला नाही.
Web Title: IPL 2018: Five reasons for Chennai's victory ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.