मुंबई : आयपीएलच्या 11 व्या हंगामाचा अर्ध टप्पा ओलांडला आहे. कोण-कोणते संघ प्लेऑफमध्ये जाणार हे चित्र स्पष्ट होऊ लागली आहेत. आशामध्ये चार विदेशी खेळाडू केळ अर्ध्यावर सोडून जाणार आहेत. यामध्ये बंगळुरु, चेन्नई आणि राजस्थानच्या खेळाडूंचा समावेश आहे. हे चारही खेळाडू इंग्लंडचे आहेत. राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी हे चौघे मायदेशी परतणार आहेत.
रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुचे मोईन अली आणि ख्रिस वोक्स विराट कोहलीची साथ सोडून मायदेशी परतणार आहेत. त्याचप्रमाणे चेन्नईचा मार्क वूड आणि राजस्थानचा बेन स्टोक्सही राष्ट्रीय संघाकडून खेळण्यासाठी मायदेशी परतणार आहेत. या चार खेळाडूंनी मध्येच आयपीएल सोडून जाण्याचा घेतलेल्या निर्णयामुळं बंगळुरु, चेंन्नई आणि राजस्थान संघाला मोठा धक्का मानला जातोय.
बंगळुरुसाठी ख्रिस वोक्सने चांगली कामगिरी केली होती. सुरुवातीच्या सामन्यात गोलंदाजी करताना सातत्याने विकेट मिळवल्या होत्या. वोक्सने काही काळासाठी सर्वाधिक विकेट्स घेऊन पर्पल कॅप डोक्यावर घातली होती. तर आयपीएल 2018 चा महागडा खेळाडू बेन स्टोक्स फेल झाला आहे. राजस्थान रॉयल्सने 12.5 कोटी रुपयांत खरेदी केलं होतं. मोईन अलीने केवळ एकच सामन्यात आरसीबीचं प्रतिनिधित्व केलं आहे. मूडनेही चेन्नईसाठी दमदार कामगिरी केल्याच्या पहायला मिळाले आहे.
24 मे पासून इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या दोन कसोटी सामन्याची मालिका सुरु होत आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी एक आठवडा या चार खेळाडूंना मायदेशी येण्याची सुचना इंग्लंड क्रिकेट मंडळाने दिली आहे. या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्सवर खेळवण्यात येईल.