आयपीएलच्या 11व्या सीझनला धमाकेदार सुरूवात होणार आहे. नेहमीप्रमाणे क्रिकेट चाहत्यांमध्ये या स्पर्धेचा उत्साह बघायला मिळतोय. आयपीएलचे आतापर्यंतचे सगळेच सीझन धमाकेदार खेळांमुळे चांगलेच गाजले. सुरवातीचे काही सीझन चिअर गर्ल्समुळेही गाजले होते. याव्यतिरीक्तही आयपीएलचे सीझन गाजले किंवा गाजताहेत ते आयपीएलमधील सुंदर, हॉट अॅंकर्समुळे….
सुंदरता आणि बुद्धीचा उत्तम मिलाफ या अॅंकर्समध्ये बघायला मिळतो. आयपीएलच्या गेल्या सीझनमध्ये या लेडी अॅकर्सनी आपला जलवा दाखवला. यावेळीही त्याच अॅंकर्स आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता अधिक आहे. पण या सर्वच हॉट, बोल्ड आणि सेक्सी अॅंकर्सनी आयपीएलमध्ये एक वेगळीच जान आणली आहे. ज्यांना विश्लेषण ऎकण्याचा कंटाळा येत होता ते आता या अॅंकर्समुळे विश्लेषण ऎकायला आणि बघायलाही लागले आहेत. बघुया यावेळी आयपीएलमध्ये धमाल उडवून देणार आहेत.
मंदिरा बेदी
मंदिरा मालिकांमधून पुढे आलेली एक लोकप्रिय अभिनेत्री. क्रिकेट अॅंकरींगमध्ये ती ख-या अर्थाने २००३ साली झालेल्या वर्ल्डकपपासून चर्चेत आली आहे. मंदिरा एक अभ्यासू निवेदक म्हणूनही प्रसिद्ध आहे. सुरुवातीला मंदिराचा क्रिकेटबाबतचा सखोल अभ्यास बघून अनेकांना आश्यर्याचा झटका बसला होता. शिवाय तिची अॅंकरीगची स्टाईल आणि तिच्या कपड्यांची स्टाईल प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. आजही ती साडीतली मंदिरा अनेकांना तशीच आठवते. इतकेच काय तर मंदिराच्या साडीमुळे अनेकदा कॉन्ट्रोव्हर्सीही झाली आहे. पण मंदिराने काही साडी परिधान करणं सोडलं नाही. यावेळीही कदाचित मंदिरा आपल्या अॅंकरिंग करताना दिसू शकते.
मयंती लंगर
आयपीएलमध्ये सर्वात लोकप्रिय अॅंकर्समध्ये मयंती लंगर हे नाव पहिल्यांदा घ्यावं लागेल. मयंती ही एक चांगली अॅंकर असण्यासोबतच ऑल राऊंडर खेळाडू स्टुअर्ट बिन्नी याची पत्नी आहे. याआधी मयंतीने भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील टेस्ट सामन्यांचे टेन स्पोर्टसाठी निवेदन केले आहे. शिवाय तिने वर्ल्डकपसाठी स्टार स्पोर्ट चॅनेलसाठी कॉमेंट्री सुद्धा केली आहे. तसेच तिने आधी ईएसपीएन चॅनलसाठीही काम केले आहे. ती क्रिकेट कॉमेंट्री विश्वा्तील एक प्रसिद्ध कॉमेंटेटर आहे. आता आयपीएलमध्येही तिने आपला जलवा दाखवला आहे.
करिष्मा कोटक
करिष्मा कोटक ही एक ब्रिटीश इंडीयन मॉडेल असण्यासोबतच क्रिकेट प्रेसेंटर सुद्धा आहे. करिष्मा ख-या अर्थाने बिग बॉस सीझन सहापासून प्रकाशझोतात आली होती. ती आयपीएल ६ ची सुद्धा को - अॅकर होती. तेव्हा तिने उत्कॄष्ट काम केले होते. सहका-यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी ती खास आकर्षण ठरली होती. यावेळीही तिला संधी मिळण्याची शक्यता आहे.
अर्चना विजया
अर्चना विजया ही भारतीय क्रिकेट विश्वातील एक उत्तम निवेदक आहे. आणि तिने निओ स्पोर्ट या चॅनेलसाठीही निवेदक म्हणून काम केले आहे. अर्चनाने टूर डायरी फॉर एक्स्ट्रा कव्हर’ आणि ‘क्रिकेट मसाला मार के’ हे शो सुद्धा होस्ट केले आहे. अर्चना सुद्धा यंदाच्या सीझनमध्ये मैदानावर बघायला मिळू शकते.
शोनाली नगरानी
शोनाली नगरानी ही फेमिना मिस इंडिया (२००४) तील मुख्य पाच स्पर्धकांमधील एक होती. तिने अनेक क्रिकेट शोज होस्ट केले आहेत. शोनालीला आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्येच होस्ट करण्याची संधी मिळाली होती. शिवाय तिने एक्स्ट्रा इनिंग सुद्धा होस्ट केल्या आहेत. सोबतच टी-२० वर्ल्डकपसाठी ईएसपीएन स्टारवर सायरस ब्रोचा सोबत एक शो होस्ट केला आहे.
शिबानी दांडेकर
शिबानी दांडेकर ही मराठीमोळी मुलगी उत्तम गायिका, अभिनेत्री आणि मॉडेलही आहे. ती आयपीएलच्या चौथ्या सीझनपासून एक्स्ट्रा इनिंग होस्ट करत आहे. ती या शोमध्ये क्रिकेट टेक्निकबद्दल नवज्योत सिंग सिद्धू आणि शोएब अख्तर सारख्या मोठ्या खेळाडूंसोबत चर्चा करते. शिबानीही आयपीएलमधून चांगलीच चर्चेत आली आहे. तिचं सहज आणि आकर्षक बोलणं खेळाडूंसोबतच प्रेक्षकांनाही भावतं. शिबानी सुद्धा यावेळी बघायला मिळेल.
लेखा वॉशिंग्टन
लेखा वॉशिंग्टन ही आयपीएलच्या पाहिल्या सीझनमध्ये क्रिकेट अॅंकरींग करण्याआधी व्हिजे म्हणून एसएस म्युझिकमध्ये काम करीत होती. लेखाने लोकप्रिय शो पिसीओ होस्ट केला होता. सोबतच लेखाने कॅनेडियन टी-२० इंटरनॅशनल टेलिव्हिजनवर होस्ट केले आहे.
रॉचेल मारिया राव
रॉचेल मारिया राव हिने आयपीएल २०१३ सीझन करिष्मा कोटक सोबत को-होस्ट केला होता. त्यांच्यासोबत समीर कोच्चर आणि गौरव कपूर हे दोन मेल अॅंकर सुद्धा होते. आता यावेळीही रॅचेल ही आयपीएलमध्ये असणार आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा आनंद मिळणार आहे.