नवी दिल्ली - पहिल्या दोन सामन्यांत सनसनाटी विजय मिळवून आयपीएलमध्ये झोकात पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जला दुखापतींचे ग्रहण लागले आहे. केदार जाधव आणि फाफ डू प्लेसिसनंतर आता चेन्नईचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाही दुखापतग्रस्त झाला आहे. पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे रैनाला पुढील दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे पंजाब आणि राजस्थानविरुद्ध होणाऱ्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जला सुरैश रैनाविना मैदानात उतरावे लागणार आहे.
दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या पहिल्या दोन्ही लढतीत थरारक विजयांची नोंद केली आहे. मुंबईत झालेल्या सलामीच्या लढतीत चेन्नईने मुंबई इंडियन्सवर मात केली होती. तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाइटरायडर्सचे आव्हान परतवून लावले होते. मात्र केदार जाधवला दुखापतीमुळे आयपीएलमधून घ्यावी लागलेली माघार, फाफ डू प्लेसिसची दुखापतीशी झुंज सुरू असतानाच रैनाही दुखापतग्रस्त झाल्याने चेन्नईसमोरील अडचणी वाढल्या आहेत.
रैनाच्या अनुपस्थितीत पुढच्या दोन सामन्यांसाठी अंबाती रायडूला मधल्या फळीत फलंदाजीसाठी पाठवले जाऊ शकते. तर सलामीला मुरली विजयल संधी मिळू शकते.
Web Title: IPL 2018 - injurd Suresh Raina ruled out
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.