ठळक मुद्देरोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोन्ही मुंबईच्या खेळाडूंना यावेळी चषकाजवळ उभे राहण्याचा मान मिळाला आहे
नवी दिल्ली : आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरु होण्यापूर्वीच चांगला गाजत आहे. काही दिवसांपूर्वी स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची हकालपट्टी झाली. चेन्नई सुपर किंग्ज संघाने सराव करताना बरीच धमाल केली. गौतम गंभीरने आपला हा अखेरचा मोसम आहे, असेही जाहीर केले आहे. त्याचबरोबर आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याची उत्सुकताही साऱ्यांना आहे. पण स्पर्धा आणि उद्घाटन सोहळा सुरु होण्यापूर्वी आयपीएलमधल्या सर्व कर्णधारांनी एकत्रित येऊन चषकाबरोबर खास पोझ दिली आहे.
रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोन्ही मुंबईच्या खेळाडूंना यावेळी चषकाजवळ उभे राहण्याचा मान मिळाला आहे. त्याचबरोबर आर. अश्विन आणि दिनेश कार्तिक हे पहिल्यांदाच कर्णधार झाले असून त्यांच्या आनंदाला यावेळी पारावार उरला नव्हता. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे एकमेकांच्या बाजूला असलेला पाहायला मिळाले.
आयपीएलच्या या हंगामाला उद्यापासून सुरु होणार आहे. सात एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये आयपीएलचा सलामीचा सामना रंगणार आहे.
Web Title: IPL 2018: IPL captains give pose with the trophy
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.