KXIPvKKR, IPL 2018 LIVE: पंजाबवर विजयासह कोलकाता चौथ्या स्थानी

कोलकाताने पंजाबसमोर 245 धावांचा डोंगर उभारला तेव्हाच त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता. कोलकात्याच्या गोलंदाजांनी पंजाबला 214 धावांपर्यंत रोखले आणि हंगामातील सहाव्या विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 03:48 PM2018-05-12T15:48:54+5:302018-05-13T04:33:15+5:30

whatsapp join usJoin us
ipl 2018 kings xi punjab vs kolkata knight riders live score live updates | KXIPvKKR, IPL 2018 LIVE: पंजाबवर विजयासह कोलकाता चौथ्या स्थानी

KXIPvKKR, IPL 2018 LIVE: पंजाबवर विजयासह कोलकाता चौथ्या स्थानी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देकोलकाता नाईट रायडर्सने शनिवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर 31 धावांनी विजय मिळवत पुन्हा एकदा चौथे स्थान पटकावले आहे.

इंदौर : सुनील नारायण आणि दिनेश कार्तिक यांच्या स्फोटक अर्धशतकी खेळीनंतर अष्टपैलू आंद्रे रसेल याच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने आज झालेल्या आयपीएल लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर ३१ धावांनी मात करीत प्लेआॅफमध्ये पोहोचण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या.
आधीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून १०२ धावांनी पराभूत होणाऱ्या केकेआरने आजच्या विजयाने १२ सामन्यांत ६ विजयांसह १२ गुण घेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब ११ सामन्यांत ६ विजय आणि ५ पराभवांसह १२ गुण घेत तिसºया स्थानावर कायम आहे.
नारायण आणि कार्तिकच्या फटकेबाज खेळीच्या बळावर केकेआरने विजयासाठी दिलेले २४६ धावांचे खडतर आव्हान किंग्ज इलेव्हनला पेलता आले नाही व त्यांना २० षटकांत ८ बाद २१४ धावांपर्यंत मजल मारली. त्यांच्याकडून लोकेश राहुलने सर्वाधिक २९ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ६६ धावांची खेळी केली व ख्रिस गेल (२१) याच्या साथीने ३४ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली. आर. आश्विनने ४५, अ‍ॅरॉन फिंचने ३४ धावांचे योगदान दिले. केकेआरकडून आंद्रे रसेलने ४१ धावांत ३ गडी बाद केले.
तत्पूर्वी, सलामीवीर सुनील नारायण याच्या शानदार ७५ धावा आणि दिनेश कार्तिकच्या तेजतर्रार अर्धशतकी खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने ६ बाद २४५ धावा फटकावल्या. ही आयपीएलमधील चौथी सर्वोच्च धावसंख्या ठरली. केकेआरने आयपीएलच्या पहिल्या सत्रात ब्रँडन मॅक्युलमच्या १५८ धावांच्या बळावर संघाची सर्वोत्तम धावसंख्या उभारली होती; परंतु आज ती मागे टाकताना त्यांची सर्वोच्च धावसंख्या रचली.
सलामीवीर फलंदाज ख्रिस लिन (२७) आणि सुनील नारायण (७५) यांनी केकेआरला आक्रमक सुरुवात करून देताना सलामीसाठी ३२ चेंडूंत ५३ धावांची भागीदारी केली. टाय याने लिन याला त्रिफळाबाद करीत ही जोडी फोडली. त्यानंतर नारायण याने आक्रमक पवित्रा कायम ठेवत २६ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले. दुसºया बाजूने रॉबिन उथप्पानेदेखील नारायणकडून प्रेरणा घेत काही चांगले फटके मारले. ११ व्या षटकात नारायण याने बरिंदर सरनला २ षटकार व एका चौकारांसह १७ धावांची भर संघाच्या धावसंख्येत टाकली. नारायण आणि उथप्पा यांनी दुसºया गड्यासाठी ७५ धावांची भागीदारी केली. टाय याने आखूड टप्प्याच्या चेंडूंवर नारायण याला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद केले. नारायण याने ३६ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ७५ धावांची खेळी सजवली. त्याच्यापाठोपाठ उथप्पाही टाय याच्याच गोलंदाजीवर मोहित शर्माच्या हाती झेल देऊन परतला. त्यानंतर कार्तिक व आंद्रे रसेल यांनी आक्रमक फलंदाजी करीत चौथ्या गड्यासाठी ३१ चेंडूंत ७६ धावांची भागीदारी केली. या दोघांनी डावाच्या १५ व १६ व्या षटकात अनुक्रमे १९ आणि २१ धावा वसूल केल्या. रसेल टायच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर कार्तिकने १९ व्या षटकात या आयपीएलमधील आपले पहिले अर्धशतक २२ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह पूर्ण केले. कार्तिकच्या आक्रमक खेळीला सरन याने पूर्णविराम दिला. अखेरच्या चेंडूवर जावोन सियरलेस याने पदार्पण लढतीत पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत संघाच्या धावसंख्येत भर टाकली. शुभमान गिल १६ धावांवर नाबाद राहिला. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून अ‍ॅण्ड्र्यू टाय याने ४१ धावांत ४ गडी बाद केले. अशा प्रकारे तो आयपीएलमध्ये सलग चार बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याआधी शादाब जकाती (२००९) आणि मुनाफ पटेल (२०१२) यांनी ही कामगिरी केली आहे.

7.37 PM : कोलकात्याचा पंजाबवर 31 धावांनी विजय

7.33 PM : पंजाब 19 षटकांत 6 बाद 208

7.26 PM : पंजाब 18 षटकांत 6 बाद 190

7.19 PM : पंजाब 16 षटकांत 6 बाद 170

7.13 PM : आरोन फिंच OUT; पंजाबला सहावा धक्का

- फटकेबाजी करणाऱ्या आरोन फिंचला तंबूत धाडत कोलकात्याने पंजाबला मोठा धक्का दिला. फिंचने 20 चेंडूत 3 षटकारांच्या जोरावर 34 धावा केल्या.

7.02 PM : पंजाबला पाचवा धक्का; अक्षर पटेल OUT

- फिरकीपटू कुलदीप यादवने अक्षर पटेलला बाद करत पंजाबला पाचवा धक्का दिला. अक्षरने 11 चेंडूंत 19 धावा केल्या.

6.51 PM : पंजाबला मोठा धक्का; लोकेश राहुल OUT

- सुनिल नरिनने लोकेश राहुलला बाद करत पंजाबला मोठा धक्का दिला. राहुलने 29 चेंडूंत 2 चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 66 धावांची दणकेबाज खेळी साकारली.

6.41 PM : करुण नायर बाद; पंजाबला तिसरा धक्का

- करुण नायरला बाद करत रसेलने पंजाबला तिसरा धक्का दिला. नायरला तीन धावांवरच समाधान मानावे लागले.

 गेलला बाद केल्यावर रसेलने असा साजरा केला आनंद... पाहा व्हीडीओ



 

6.29 PM : सलग दुसऱ्या चेंडूवर कोलकात्याला धक्का; मयांक अगरवाल बाद

- रसेलने गेलल्या बाद केल्यावर दुसऱ्याच चेंडूवर मयांक अगरवालला बाद करत पंजाबला सलग दुसरा धक्का दिला. मयांकला भोपळाही फोडता आला नाही.

6.28 PM : ख्रिस गेल OUT; पंजाबला मोठा धक्का

- सहाव्या षटकात आंद्रे रसेलने गेलला बाद कर पंजाबला मोठा धक्का दिला. गेलने 17 चेंडूंत 21 धावा केल्या.

6.26 PM : गेलचा सहाव्या षटकात पहिला षटकार

6.23 PM : पाचव्या षटकात पंजाबच्या 50 धावा पूर्ण

6.16 PM :  ख्रिस गेलला 13 धावांवर असताना जीवदान

- आंद्रे रसेलच्या चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर गेलचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने झेल सोडला. त्यावेळी गेल 13 धावांवर होता.

इंदूरमध्ये धावांचा महापूर; कोलकात्याच्या पंजाबविरुद्ध 245 धावा

इंदूर : एकिकडे कर्नाटकमध्ये मतांचा पूर आला असताना इंदूरमध्ये मात्र धावांचा महापूर पाहायला मिळाला. कोलकाता नाईट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या शनिवारच्या सामन्यात तब्बल 245 धावांची लूट केली. यंदाच्या आयपीएलमधली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. त्याचबरोबर कोलकात्याची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 2008 साली कोलकात्याने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात 222 धावा केल्या होत्या. या सामन्यात सुनिल नरिन आणि दिनेश कार्तिक यांनी धडाकेबाज फलंदाजी करत संघाला धावांचा डोंगर उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. नरिनने 36 चेंडूंत 9 चौकार आणि चार षटकारांच्या जरावर 75 धावांची वादळी खेळी साकारली, तर कार्तिकने 23 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 50 धावा केल्या.

5.41 PM : कोलकात्याचे पंजाबपुढे 246 धावांचे आव्हान

5.39 PM : दिनेश कार्तिक बाद; कोलकात्याला सहावा धक्का

- अर्धशतक झळकावल्यावर कार्तिक लगेचच बाद झाला. बरिंदर सरणने त्याला बाद करत कोलकात्याला सहावा धक्का दिला. कार्तिकने 23 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 50 धावा केल्या.

5.31 PM : नीतीश राणा बाद; कोलकात्याला पाचवा धक्का

- मोहित शर्माने नीतीश राणाला बाद करत कोलकात्याला पाचवा धक्का दिला. नीतीशने 4 चेंडूंत 11 धावा केल्या.

5.23 PM : कोलकात्याला चौथा धक्का; आंद्रे रसेल बाद

अॅण्ड्र्यू टायने आंद्रे रसेलला बाद करत कोलकात्याला चौथा धक्का दिला. रसेलने 14 चेंडूंत 2 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 31 धावा केल्या.

5.21 PM : कोलकाताच्या सतराव्या षटकात दोनशे धावा पूर्ण

- सतराव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आंद्रे रसेलने चौकार लगावत कोलकात्याच्या दोनशे धावा पूर्ण केल्या.

5.13 PM : कोलकाता पंधरा षटकांत 3 बाद 169

4.58 PM :  रॉबिन उथप्पा OUT; कोलकात्याला तिसरा धक्का

- बाराव्या षटकातच अॅण्ड्र्यू टायने रॉबिन उथप्पाला बाद करत कोलकात्याला तिसरा धक्का दिला. उथप्पाने 17 चेंडूंत 24 धावा केल्या.

4.55 PM : सुनील नरिन OUT; कोलकात्याला दुसरा धक्का

अॅण्ड्र्यू टायने बाराव्या षटकात नरिनला बाद करत कोलकात्याला दुसरा धक्का दिला. नरिनने 36 चेंडूंत 9 चौकार आणि चार षटकारांच्या जरावर 75 धावांची वादळी खेळी साकारली.

4.40 PM : सुनील नरीनचे 26 चेंडूंत अर्धशतक

- नरिनने पंजाबच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेत 26 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.

4.26 PM : कोलकात्याला पहिला धक्का; ख्रिस लिन बाद

- पंजाबच्या अॅण्ड्र्यू टायने ख्रिस लिनला बाद करत कोलकात्याला पहिला धक्का दिला. लिनने 17 चेंडूंत प्रत्येकी दोन चौकार आणि षटकारांच्या जोरावर 27 धावा केल्या.

4.22 PM : कोलकात्याचे पाच षटकांत बिनबाद 47

4.00 PM : ख्रिस लिनचे कोलकात्यासाठी सलग दोन चौकार

- मोहित शर्माच्या पहिल्या षटकात ख्रिस लिनने दोन षटकार लगावत कोलकात्याला झोकात सुरुवात करून दिली.

दोन्ही संघांनी सराव कसा केला... पाहा हा व्हीडीओ



 

इंदूर : आयपीएल-११ मध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी झगडणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सला आता किंग्स इलेव्हन पंजाबशी दोन हात करावे लागणार आहेत. गेल्या लढतीत मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानं कोलकाता पाचव्या क्रमांकावर आहे, तर पंजाबचा संघ तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे पंजाब प्ले-ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणार की कोलकाता आशा कायम ठेवणार, याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे. 

 

दोन्ही संघ



 



 

पंजाब वि. कोलकाता सामन्याचे लाइव्ह अपडेट्स

3.34 : किंग्ज इलेव्हन पंजाबचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय... कोलकात्याची फलंदाजी...  



 

Web Title: ipl 2018 kings xi punjab vs kolkata knight riders live score live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.