मुंबई : आयपीएल आता काही तासांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेत कोण जिंकणार, याची उत्सुकता साऱ्यांच आहे, पण त्यापेक्षाही जास्त आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात काय होणार, हे जाणून घेण्यासाठी सध्याच्या तुम्हीही उत्सुक असाल.
आयपीएलचा उद्घाटन सोहळा उद्या (7 एप्रिल) सायंकाळी 6 वाजता सुरु होणार आहे. हा सोहळा जवळपास सव्वा तास चालणार आहे. सोहळा संपल्यावर 15 मिनिटांमध्ये सलामीच्या लढतीची नाणेफेक होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये सलामीची लढत खेळवली जाणार आहे. सुरुवातीला आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी 50 कोटी रुपयांच बजेट ठरवण्यात आले होते. पण बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने या बजेटला कात्री लावली आणि अखेर 18 कोटी रुपये उद्घाटन सोहळ्यासाठी मंजूर करण्यात आले. त्यामुळे या सोहळ्यात आता आंतरराष्ट्रीय कलाकार आपली अदाकारी सादर करणार नाहीत. पण बॉलीवूडमधील नामांकित स्टार्स या सोहळ्यामध्ये आपली अदाकारी सादर करणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्यात ऋतिक रोशन, वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस आणि प्रभुदेवा हे कलाकार नृत्याविष्कार सादर करणार आहेत. प्रभूदेवा बॉलीवूडमधील काही गाणांवर न्यृत्य करणार आहे. यामध्ये ‘धूम मचाले’, ‘एक पल का जीना’, ‘बावरे बावरे’ आणि ‘सेनोरीटा’ सारख्या सुपर हिट गाण्यांवर प्रभूदेवा आपली अदाकारी सादर करेल.
उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रसारण Star Sports 1, Star Sports 2, Star Sports 3, Star Sports HD, Star Sports हिंदी आणि Star Sports English या चॅनेल्सवर पाहता येईल. त्याबरोबर live streaming Hotstar वर उपलब्ध असेल.