मुंबई - आपल्या सांघिक खेळीच्या जोरावर कोट्यवधी चाहते निर्माण करणाऱ्या मुंबई इंडियन्स या संघाने एक लाजिरवाणा विक्रम आपल्या नावे केला आहे. हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईला पहिल्या सहा षटकांत फक्त 22 धावा करता आल्या. आयपीएलच्या 11 व्या सत्रामध्ये ही सर्वात संथ सुरुवात आहे. या आधी हा लाजिरवाणा विक्रम चेन्नईच्या नावावर होता.
विशेष म्हणजे हैदराबाद विरोधातच चेन्नईच्या नावावर हा लाजिरवाणा विक्रम झाला होता. 22 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात चेन्नईने पहिल्या सहा षटकांत एक विकेट गमावत 27 धावा केल्या होत्या. वानखेडेवर काल झालेल्या सामन्यात मुंबईने सहा षटकांत तीन विकेट गमावत 22 धावा केल्या. चेन्नईपूर्वी हा विक्रम दिल्ली संघाच्या नावावर होता. दिल्लीने बंगळुरुविरोधात पहिल्या सहा षटकांत फक्त 28 धावा केल्या होत्या.
हैदराबाद दिलेलल्या 119 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई संघा अवघ्या 87 धावांवर गारद झाला. 100 धावांच्या आत सर्वबाद होण्याची मुंबईची ही सहावी वेळ आहे. दिल्लीचा संघ 9 वेळा 100 धावांच्या आत बाद झालेला आहे. हैदराबादने मुंबईचा 31 धावांनी पराभव केला. सहा सामन्यात मुंबईचा हा पाचवा पराभव आहे. यापराभवामुळं मुंबईच्या प्लेऑफचा प्रवेश खडतर झाला आहे.