नवी दिल्लीः क्रिकेटचा 'रन'संग्राम म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेत चौकार, षटकारांची आतषबाजी नवी नाही. परवाच्या चेन्नई-बेंगलोर यांच्यातील सामन्यात तर षटकारांचा विक्रमच झाला होता. रथी-महारथी फलंदाजांचे उत्तुंग षटकार पाहणं ही क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच असते. त्यात तो विजयी षटकार असेल तर काय विचारता!
षटकारांचा पाऊस पाडून क्रिकेटवेड्यांचं मनोरंजन करण्यात ख्रिस गेलचा हातखंडा आहे. गेलनं यंदाही चाहत्यांना ही ट्रिट दिली आहे. आपला महेंद्रसिंह धोनीही त्यात 'माही'र आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप-५ फलंदाजांमध्ये हे दोघंही आहेत. त्यांच्यासोबत अन्य तिघे कोण आहेत आणि आत्तापर्यंत कुणी किती षटकार ठोकलेत बघूया...
ख्रिस गेल (किंग्ज इलेव्हन पंजाब) - ४ सामने - २३ षटकार
एबी डिविलियर्स (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) - ६ सामने - २३ षटकार
आंद्रे रसेल (कोलकाता नाइट रायडर्स) - ६ सामने - १९ षटकार
अंबाती रायुडू (चेन्नई सुपरकिंग्ज) - ६ सामने - १५ षटकार
महेंद्रसिंह धोनी (चेन्नई सुपरकिंग्ज) - ६ सामने - १४ षटकार