नवी दिल्ली : आयपीएलच्या या सीझनमध्ये खेळाडूंच्या जखमांमुळे चेन्नई टीमची चिंता वाढली आहे. लागोपाठ काही खेळाडू अनफिट असल्याने टीमबाहेर जात आहे. आधी केदार जाधव टीममधून बाहेर गेला, नंतर टीममधील मह्त्वाचा खेळाडू सुरेश रैना दोन तीन सामन्यांसाठी बाहेर होता. आता चेन्नई टीम खूप अडचणीत असल्याचं चित्र आहे.
टीमचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा पाठीच्या त्रासाने ग्रस्त आहे. गेल्या सामन्याच पाठीचा त्रास असूनही तो पंजाब विरुद्घ खेळला होता. त्याच सामन्यावेळी ही शंका उपस्थित झाली होती की, तो खेळेल की नाही. आता आज राजस्थान रॉयल्स विरुध्द सामना आहे. अशात सराव सामन्यावेळी धोनी दिसला नाही
चेन्नईवरुन सगळे सामने आता पुण्याला शिफ्ट करण्यात आले आहेत. सामन्याआधी सराव सामन्यावेळी धोऩी उपस्थित नव्हता. मीडिया रिपोर्टनुसार, धोनी पाठीच्या त्रासामुळे उपस्थित नव्हता. पण दिलासादायक बाब ही आहे की, सुरेश रैना सराव सामन्यावेळी होता.
शक्यता ही वर्तवली जात आहे की, धोनी केवळ बॅटींगसाठी मैदानात येऊ शकतो. एन जगदीसन किंवा अंबाती रायडूकडे विकेटकिपींग सोपवली जाऊ शकते. चेन्नईने 15 एप्रिलला पंजाब विरुद्ध सामना खेळला होता. या सामन्यात धोनीने 79 रन्सची दमदार खेळी केली होती. त्याला पाठीचा त्रास होतानाही तो टीमसाठी खेळला. पण आज त्याला त्रास झाला तर टीमसाठी अडचणी वाढू शकतात.