मुंबई - जेतेपद कायम राखण्याच्या उद्देशाने आयपीएलच्या ११व्या सत्रात खेळणारा गतविजेता मुंबई इंडियन्स संघ सलामीला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके) संघाविरुद्ध भिडेल.वानखेडे स्टेडियमवर शानदार उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर मुंबईचे धुरंधर विजयी सलामी देण्यास मैदानात उतरतील. मुंबई संघात कर्णधार रोहित शर्मासह अनेक स्टार खेळाडूंचा समावेश असला तरी पहिल्या सामन्यात विजय मिळवणे त्यांच्यासाठी सोपे जाणार नाही. कारण कल्पक नेतृत्व करण्यात तरबेज असलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके संघ पुन्हा एकदा आपला दबदबा राखण्यासाठी उत्साहाने भरलेला आहे. विशेष म्हणजे गेली १० वर्षे मुंबईचा अविभाज्य भाग राहिलेला अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग यंदा पहिल्यांदाच सीएसकेकडून खेळणार आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष भज्जीवर लागले आहे.मुंबईची फलंदाजी प्रामुख्याने कर्णधार रोहित शर्मावर अवलंबून असेल. जेव्हा रोहित फॉर्ममध्ये असतो, तेव्हा तो किती धोकादायक बनतो याची पुरेपूर जाणीव धोनीला असल्याने त्याला लवकरात लवकर बाद करण्याचे प्रमुख लक्ष्य सीएसकेचे असेल. एविन लेविस, किएरॉन पोलार्ड ही विंडीज जोडी, इशान किशान, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड यांच्यामुळेही मुंबईच्या फलंदाजीला बळकटी आली आहे. हार्दिक पांड्यामुळे संघाकडे निर्णायक अष्टपैलू आहे. जसप्रीत बुमराहसह मुस्ताफिझूर रहमान, पॅट कमिन्स आणि मिशेल मॅक्क्लेनघन असा गोलंदाजीचा ताफा आहे. दुसरीकडे, सीएसके संघ अत्यंत मजबूत दिसत असून, त्यांच्याकडे अनुभवी खेळाडूंची भक्कम फळी आहे.प्रतिस्पर्धी संघमुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, पॅट कमिन्स, बेन कटिंग, अकिला धनंजय, जेपी ड्युमिनी, इशान किशान, सिद्धेश लाड, एविन लेविस, शरद लुंबा, मयांक मरकंदे, मिशेल मॅक्क्लेनघन, मोहसिन खान, मुस्तफिझूर रहमान, एमडी निधीश, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, किएरॉन पोलार्ड, अनुकूल रॉय, प्रदीप सांगवान, तजिंदर सिंग, आदित्य तरे, सौरभ तिवारी आणि सूर्यकुमार यादव.चेन्नई सुपरकिंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), केएम आसिफ, सॅम बिलिंग्स, चैतन्य बिष्णोई, द्वेन ब्रावो, दीपक चाहर, फाफ डुप्लेसिस, हरभजन सिंग, इम्रान ताहिर, रवींद्र जडेजा, केदार जाधव, नारायण जगदीशन, क्षितिज शर्मा, मोनू कुमार, लुंगी एनगिडी, सुरेश रैना, अंबाती रायडू, मिशेल सॅटनर, कनिष्क सेठ, कर्ण शर्मा, ध्रुव शोरे, शार्दुल ठाकूर, मुरली विजय, शेन वॉटसन आणि मार्क वूड.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2018 : सलामीला मुंबईकर चेन्नईविरुद्ध भिडणार
IPL 2018 : सलामीला मुंबईकर चेन्नईविरुद्ध भिडणार
जेतेपद कायम राखण्याच्या उद्देशाने आयपीएलच्या ११व्या सत्रात खेळणारा गतविजेता मुंबई इंडियन्स संघ सलामीला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज (सीएसके) संघाविरुद्ध भिडेल.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 2:11 AM