नवी दिल्ली : बीसीसीआयने डेव्हिड वॉर्नरची आयपीएलमधून उचलबांगडी केली. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने ' या ' खेळाडूला वॉर्नरच्या जागी खेळण्याची विनंती केली होती. पण ' या ' खेळाडूने आयपीएलमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हैदराबादच्या संघाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
चेंडूशी छेडछाड केल्यामुळे वॉर्नरवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर वॉर्नरने हैदराबादचे कर्णधारपद सोडले होते. पण बीसीसीआयने त्याच्यावर आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली होती. त्यानंतर हैदराबादच्या संघाने ' या ' खेळाडूला वॉर्नरच्या जागी खेळण्यात विचारणा केली होती. पण श्रीलंकेच्या कुशल परेराने मात्र आयपीएलमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. श्रीलंकेत काही दिवसांपूर्वी झालेल्या निदाहास ट्रॉफीमध्ये परेराने 4 ट्वेन्टी-20 सामन्यांमध्ये तीन अर्धशतके झळकावली होता. यापूर्वी परेरा राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे.
याबाबत परेराने सांगितले की, " एप्रिल आणि मे महिन्यामध्ये काही स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये मला खेळायचे आहे. कारण त्यांना मी काही महिन्यांपूर्वीच खेळणार असल्याचे कबूल केले असल्याने मला स्थानिक क्रिकेटमध्ये खेळावे लागेल. त्यामुळे मी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकत नाही. "