Join us  

IPL 2018 : घरच्या मैदानावर जिंकण्याचा राजस्थान रॉयल्स संघाचा इरादा

पाच वर्षांनंतर प्रथमच सवाई मानसिंग स्टेडियमवर बुधवारी आयपीएलचा सामना होणार आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाविरुद्ध यजमान राजस्थान रॉयल्स संघ घरच्या चाहत्यांपुढे विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 4:46 AM

Open in App

जयपूर : पाच वर्षांनंतर प्रथमच सवाई मानसिंग स्टेडियमवर बुधवारी आयपीएलचा सामना होणार आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाविरुद्ध यजमान राजस्थान रॉयल्स संघ घरच्या चाहत्यांपुढे विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे. रॉयल्स आणि दिल्ली या दोन्ही संघांना पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीला किंग्स इलेव्हन पंजाबने मोहाली येथे सहा गड्यांनी पराभूत केले.दुसरीकडे, रॉयल्सचा हैदराबादने ९ गड्यांनी पराभव केलेला आहे. दोन वर्षांच्या निलंबनानंतर पुनरागमन करणारा रॉयल्ससंघ अपेक्षित कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. स्टीव्ह स्मिथच्या अनुपस्थितीत राजस्थानचा संघ कमकुवत दिसत आहे.बेन स्टोक्ससारखा महागडा खेळाडू फिरकीपटूंचा सामना करण्यात अपयशी ठरत आहे. त्यांचा संघ केवळ १२५ धावांपर्यंतच मजल मारू शकला आहे. संजू सॅमसन (४९) व्यतिरिक्त इतर खेळाडू अपयशी ठरले.संघाचा मेंटर शेन वॉर्न याला आपल्या खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी प्रोत्साहित करावे लागेल.दुसरीकडे, दिल्लीचा संघसुद्धा पंजाबविरुद्धच्या सामन्यात झालेला पराभव विसरलेला नाही. कर्णधार गौतम गंभीरने ५५ धावा केल्या होत्या. ऋषभ पंत तसेच ख्रिस मॉरिस यांनी योगदान दिले; मात्र संघ विजय मिळवू शकला नाही. दिल्लीकडे ट्रेंट बोल्ट, मोहम्मद शमी, मॉरिस आणि अमित मिश्रा हे चांगले गोलंदाज आहेत. गंभीरच्या रुपात संघाकडे आक्रमक कर्णधार आहे.

टॅग्स :आयपीएल 2018राजस्थान रॉयल्स