Join us  

नाराज कोहली भडकला, असं खेळलो तर कधीच जिंकू शकणार नाही!

संघाच्या क्षेत्ररक्षणामुळं झालेला पराभव सामन्यानंतर कोहलीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 6:52 AM

Open in App

बगंळुरु - गचाळ क्षेत्ररक्षणामुळं कोलकाताविरोधात विजय मिळवण्याची संधी बंगळुरु संघाने गमावली. पराभवानंतर  कर्णधार विराट कोहलीनं आपली नाराजी जाहिरपणे बालून दाखवली आणि राग व्यक्त केला. रविवारी झालेल्या सामन्यात कोलकात्यानं बंगळुरुचा सहा गड्यानी पराभव केला. संघाच्या क्षेत्ररक्षणामुळं झालेला पराभव  सामन्यानंतर कोहलीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. 

कोहली म्हणाला, जर आम्ही आजच्या सामन्यासारखं क्षेत्ररक्षण केलं तर कधीच जिंकू शकणार नाही. आम्हाला खेळ सुधारावा लागेल नाहीतर आमचा विजयावर काहीही हक्क नाही. कोलकात्याविरोधात क्षेत्ररक्षणामध्ये आमच्याकडून खूप चूका झाल्या. सोपे आणि सहज झेल आमच्या खेळाडूंनी सोडले. समोरच्या संघाला अनेकवेळा आघाडी घेण्याची  संधी दिली. दोन्ही संघामध्ये हाच मोठा फरक होता.  कोहली पुढे म्हणाला, 175 धावांचे आव्हान आव्हानात्मक होते पण आमचे क्षेत्ररक्षण खूपच सुमार दर्जाचे झाल्यामुळं पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये जर सुधारणा केली नाही तर आम्ही कधीच जिंकू शकणार नाही. संघा अपेक्षेनुसार कामगिरी करत नसल्याची कबुलीही कोहलीने सामन्यानंतर दिली.

संघ सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. आतापर्यंत झालेल्या सात सामन्यात आम्हाला पाच पराभवाला सामोरं जावं लागले आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आणखी सहा सामन्यात विजय मिळवावा लागेल. आम्हाला आमच्या खेळात सुधारणा करावी लागेल. संघातील खेळाडू आपल्या खेळात बदल करतील आणि पुढील सामन्यात आपले पर्दशन चांगले करतील अशी आशा असल्याचे विराट कोहलीने सांगितले.  

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या झंजावती नाबाद 68 धावांच्या जोरावर बंगळुरूने निर्धारीत 20 षटकात 4 गडी गमावत 175 धावा करत कोलकाता समोर विजयासाठी 176 धावांचे आव्हान ठेवले होते. आरसीबीने दिलेले १७६ धावांचे आव्हान केकेआरने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १९.१ षटकांत पार केले. यासह केकेआरने ८ गुणांसह आपले चौथे स्थान कायम राखले, तर आरसीबी आणखी एका पराभवासह सातव्या स्थानी कायम आहे.  सलामीवीर ख्रिस लीन (६२*) याने झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने ६ बळींनी शानदार विजय मिळवताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे कडवे आव्हान परतवले.

टॅग्स :आयपीएल 2018विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्स