विराट सेनेचे आव्हान संपुष्टात; विजयासह राजस्थान चौथ्या स्थानी
जयपूर : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे आयपीएलमधील आव्हान शनिवारी संपुष्टात आले. राजस्थान रॉयल्स आणि बंगलोर यांच्यातील हा सामना निर्णायक असाच होता. राजस्थानने राहुल त्रिपाठीच्या 80 धावांच्या खेळीच्या जोरावर 164 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगलोरच्या चार फलंदाजांना श्रेयस गोपालने माघारी धाडले आणि राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
7.29 : बेंगलोरचा खेळ खल्लास; राजस्थानच्या आशा कायम
7.26 : राजस्थानला विजयासाठी एका विकेटची गरज
7.22 : बेंगलोरला नववा धक्का; टीम साऊथी बाद
7.11 : उमेश यादव बाद; बेंगलोरला आठवा धक्का
7.09 : सर्फराझ खान बाद; बेंगलोरला सातवा धक्का
6.50 : बेंगलोरला मोठा धक्का; एबी डी' व्हिलियर्स OUT
6.45 : बेंगलोरला चौथा धक्का; मनदीप सिंग बाद
6.38 : बेंगलोरला तिसरा धक्का; मोईन अली बाद
06.34 : बेंगलोरला दुसरा धक्का; पार्थिव पटेल बाद
06.27 : 7 ओव्हरनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्कोर 1 विकेट गमावून 63 रन्स
06.20 : 6 ओव्हरनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्कोर 1 विकेट गमावून 55 रन्स
06.15 : 5 ओव्हरनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्कोर 1 विकेट गमावून 45 रन्स
06.12 : 4 ओव्हरनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्कोर 1 विकेट गमावून 31 रन्स
06.11 : विराट आऊट झाल्यावर एबी डिविलियर्स फलंदाजीसाठी मैदानात
06.07 : केवळ 4 रन्स करुन विराट कोहली माघारी, क्रिष्णप्पा गोथॅमने घेतली विकेट
06.06 :
06.06 : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्कोर 3 ओव्हरनंतर 20 रन्स, विराट आणि पटेलची फटकेबाजी
06.02 : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्कोर 2 ओव्हरनंतर 16 रन्स
06.01 : विराट कोहली आणि पार्थिव पटेलने केली खेळाची सुरुवात
5.59 : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या खेळाडू मैदानात, पहिल्या ओव्हरमध्येच दमदार सुरुवात
राजस्थानच्या खेळाडूंनी शेवटच्या ओव्हरमध्ये 15 रन्सचा स्कोर 5 विकेटच्या नुकसानावर 164 रन्सपर्यंत पोहोचवला. राहुल त्रिपाठीने यात 58 बॉल्समध्ये 80 रन्सचे महत्वपूर्ण योगदान दिले. 19 व्या ओव्हरमध्ये राजस्थान टीमने शेवटच्या बॉलवर मोहम्मद सिराजने हेनरिक क्लासेनला आऊट करत चौथा धक्का दिला. क्लासेनने 21 बॉल्समध्ये 32 रन्स केले.
5.54 : उमेश यादवने घेतल्या तीन विकेट
5.45 : राजस्थान रॉयल्सकडून राहुल त्रिपाठीने केली सर्वात जास्त 80 रन्सची खेळी
5.41 : राजस्थान रॉयल्सने पहिल्यांदा फलंदाजी करत 5 विकेट गमावून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला विजयासाठी 165 रन्सचे आव्हान
5.40 :
5.36 : 19व्या ओव्हरनंतर राजस्थान रॉयल्सचा स्कोर 3 विकेट गमावून 149 रन्स, एच क्लासेन आणि राहुल त्रिपाठी मैदानात
5.29 : 18व्या ओव्हरनंतर राजस्थान रॉयल्सचा स्कोर 3 विकेट गमावून 136 रन्स, एच क्लासेन आणि राहुल त्रिपाठी मैदानात
5.24 : 17व्या ओव्हरनंतर राजस्थान रॉयल्सचा स्कोर 3 विकेट गमावून 129 रन्स, एच क्लासेन आणि राहुल त्रिपाठी मैदानात
5.20 : 16व्या ओव्हरनंतर राजस्थान रॉयल्सचा स्कोर 3 विकेट गमावून 124 रन्स, एच क्लासेन आणि राहुल त्रिपाठी मैदानात
5.16 : 15 व्या ओव्हरनंतर राजस्थान रॉयल्सचा स्कोर 3 विकेटच्या नुकसानावर 113 रन्स, एच क्लासेन आणि राहुल त्रिपाठी मैदानात
5.11 : 14 व्या ओव्हरनंतर राजस्थान रॉयल्सचा स्कोर 3 विकेट गमावून 104 रन्स, एकाच ओव्हरमध्ये उमेश यादवने घेतल्या दोन विकेट
5.08 : उमेश यादवला आणखी विकेट, खातंही न उघडता एस सॅमसन माघारी परतला. राजस्थान रॉयल्सचा स्कोर 3 विकेट गमावून 103 रन्स
5.05 : 33 रन्स काढून अजिंक्य रहाणे आऊट, उमेश यादवला दुसरी सफलता
5.03 : 13 ओव्हरनंतर राजस्थान रॉयल्सचा स्कोर 101 रन्स पूर्ण
4.58 : राहुल त्रिपाठीचं 38 बॉल्समध्ये अर्धशतक पूर्ण....
4.56 : 12 ओव्हरनंतर राजस्थान रॉयल्सचा स्कोर एक विकेट गमावून 92 रन्स.
4.53 : राजस्थान रॉयल्सचे खेळाडू सध्या 7.27 रन रेटच्या सरासरीने रन्स काढत आहेत.
4.52 : 11 ओव्हरनंतर राजस्थान रॉयल्सचा स्कोर 1 विकेट गमावून 80 रन्स.
4.48 : 9व्या ओव्हरनंतर राजस्थान रॉयल्सचा स्कोर एक विकेट गमावून 63 रन्स. मैदानात राहुल त्रिपाठी आणि अजिंक्य रहाणे उपस्थित.
4.25 : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला.
4.48 : 6 ओव्हरनंतर राजस्थान रॉयल्सचा स्कोर एक विकेटच्या नुकसानावर 45 रन. मैदानात राहुल त्रिपाठी आणि अजिंक्य रहाणे...
4.37 : 4 ओव्हरनंतर राजस्थान रॉयल्सचा स्कोर एक विकेटच्या नुकसानावर 25 रन्स.
4.35 : दोन ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सचा स्कोर एक विकेट गमावून 2 रन.
4. 25 : दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर उमेश यादवने घेतली जोफ्रा आर्चरची विकेट. एकही रन न काढता आर्चर माघारी.
4.00 : राजस्थानकडून राहुल त्रिपाठी आणि जोफ्रा आर्चरने सुरु केली खेळी. बेंगळुरुकडून युरवेंद्र चहलने केली गोलंदाजीची सुरुवात..
3.30 : राजस्थाल रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला.
जयपूर : मागच्या तीन सामन्यात विजय मिळताच आत्मविश्वास उंचावलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ आयपीएलमध्ये आज शनिवारी राजस्थान रॉयल्सवर मोठ्या विजयाच्या शोधात आहे. राजस्थानला जोस बटलर आणि बेन स्टोक्स यांची उणीव जाणवेल. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांचे समान १२-१२ गुण आहेत. आरसीबी पाचव्या आणि राजस्थान गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.
प्ले ऑफच्या शर्यतीत पाच संघ असल्याने चुरस निर्माण झाली. दोन्ही संघ विजयासह धावगती वाढविण्याचादेखील प्रयत्न करणार आहेत. रॉयल्ससाठी प्रत्येक सामन्यात मोठी भूमिका वठविणारे बटलर आणि स्टोक्स मायदेशी परतले. संघाचा मेंटर शेन वॉर्न हादेखील डग आऊटमध्ये दिसणार नाही. आरसीबीने काल सनरायझर्सचा १४ धावांनी पराभव करीत सलग तिसरा विजय साजरा केला. पण आज जो संघ पराभूत होईल तो बाहेर पडणार असल्याने उभय संघ सावध वाटचाल करणार आहेत.
Web Title: ipl 2018 rr vs rcb jaipur match live update
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.