पुणे : आयपीएल 2018 च्या 17 व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने राजस्थान रॉयल्सला 64 रन्सच्या मोठ्या अंतराने मात दिली. चेन्नईने पाच विकेटच्या नुकसानावर 204 रन्सची खेळी केली. त्यानंतर 205 रन्सचा पाठलाग करत राजस्थान टीम 18.3 ओव्हरमध्ये 140 रन्स करुन माघारी परतली. चेन्नईच्या या विजयाचा खरा मानकरी ठरला शेन वॉटसन.
शेन वॉटसनने राजस्थान रॉयल्स विरुद्ध शतक झळकावलं आणि आयपीएलच्या या सीझनमध्ये शतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठरला. आयपीएलमधील हे त्याचं तिसरं शतक आहे. याआधी किंग्स इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेलने याच सीझनचं पहिलं शतक झळकावलं. वॉटसनने 51 बॉल्समध्ये हे शतक झळकावलं. तर गेलने त्याचं शतक 58 बॉल्समध्ये पूर्ण केलं. वॉटसनने राजस्थान रॉयल्स विरुध्द 57 बॉल्समध्ये 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 106 रन्सची दमदार खेळी केली.
वॉटसनने आयपीएलचं आपलं पहिलं शतक 2013 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत चेन्नई सुपरकिंग्स विरुध्द केलं होतं. तेव्हा त्याने 1010 रन्सची खेळी केली होती. त्यानंतर वॉटसनने त्याचं दुसरं शतक 2015 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लगवालं होतं. केकेआर विरुद्ध त्या सामन्यात वॉटसनने 104 रन्सची नाबाद खेळी केली होती.