मुंबई - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा सर्व खेळाडूंसाठी एक प्रेरणास्रोत आहे. कॅप्टन कूल म्हणून नावारुपाला आलेल्या धोनीने आपल्या निर्णयाच्या बळावर अनेक सामने जिंकून दिले आहेत. धोनीसारखेच नेतृत्वगुण हैदराबाद संघाच्या कर्णधाराकडे असल्याचे सुनील गावसकरांनी म्हटले आहे. कॅप्टन कूल धोनीशी तुलना करुन गावसकरांनी केन विल्यम्सनची पाठ थोपटली आहे. वॉर्नरच्या अनुपस्थिती हैदराबाद संघाची धुरा केन विल्यम्सनने चांगल्या प्रकारे निभावली आहे. त्याच्या नेतृत्वात गावसकरांना धोनीची झलक दिसली आहे.
सामन्यामध्ये दबाव असताना विल्यम्सन धोनीप्रमाणेच शांत असतो. त्याचा फायदा संघाला फायदा संघाला होतो. वॉर्नरच्या उपस्थितीत विल्यम्सनला संघात जागा मिळाली नव्हती. कारण आयपीएलच्या नियमांप्रमाणे संघात फक्त चार विदेशी खेळाडूंना संधी मिळते. त्यामुळं विल्यम्सनला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली नव्हती. पण संधी मिळाल्यानंतर विल्यम्सनने स्वत:ला सिद्ध केले. नेतृत्वाबरोबरच संघासाठी प्रत्येक सामन्यात धावा जमवल्या आहेत. कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरलेल्या हैदराबादच्या संघाने गावसकरांना प्रभावित केले आहे. गावसकरांच्या मते हैदराबादचा संघ कमी धावसंख्येचाही चांगल्या प्रकारे बचाव करु शकतो आणि मोठी धावसंख्याही पार करु शकतो.
सनरायझर्सने आतापर्यंत 9 पैकी 7 सामन्यांत विजय मिळवत 14 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली आहे. गुणतालिकेत हैदराबाद संघ सध्या अव्वल स्थानावर आहे.
Web Title: IPL 2018: Sunil Gavaskar picks a skipper who is as 'cool' as MS Dhoni
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.