कोलकाता - आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला कोलकात्याचा युवा नितिश राणाने बोल्ट आऊट केलं होतं. राणाचे प्रदर्शनावर खूश होऊन विराट कोहलीनं त्याला बॅट गिफ्ट केली. विराटला बाद केल्यानंतर आनंद साजरा करत असताना नितिश राणाने काही अपशब्दांचा वापर केला होता. पण विराट कोहलीनं राणाच्या या अपशब्दांकडे दुर्लक्ष करुन त्याला प्रोत्साहन देत बॅट गिफ्ट केली.
आयपीएलच्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विराट आणि डिव्हिलियर्स संघाची मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते. त्यावेळी युवा नितेश राणाने लागोपाठच्या दोन चेंडूवर दोघांना बाद करत धावसंखेला आळा घातला. विराट कोहलीला बाद केल्यानंतर आपत्तीजनक शब्दांचा वापर केला होता. राणाच्या या कृतीला सोशल मीडियावर त्याच्यावर कडाडून टीका करण्यात आली.
विराट कोहलीनं राणाच्या या कृतीकडे दुर्लक्ष करत विराटने त्याला भविष्यसाठी शुभेच्छा दिल्या आणि बॅट गिफ्ट केली. राणाने इनस्टाग्रामवर बॅटसह फोटो पोस्ट केला आहे. एखाद्या दिग्गज खेळाडूकडून आपल्या खेळाची स्तुती होत असेल तर आपल्यावरील जबाबदारी आणखी वाढते. चांगला खेळ करण्यासाठी उत्साह वाढला आहे. विराट भावा धन्यवाद....
आक्रमक सलामीवीर सुनिल नरेन (५०) आणि कर्णधार दिनेश कार्तिक (३५*) यांच्या जोरावर कोलकातानं नाइट रायडर्सने यंदाच्या आयपीएल सत्रात विजयी सलामी देताना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा ४ बळींनी पराभव केला. आरसीबीने दिलेले १७७ धावांचे आव्हान कोलकाताने १८.५ षटकात ६ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. युवा नितिश राणाने २५ चेंडूत ३४ धावा, तर कर्णधार कार्तिकने अखेरपर्यंत टिकून राहत २९ धावांत नाबाद ३५ धावा काढून संघाला विजयी केले. ख्रिस वोक्सने (३/३६) नियंत्रित मारा करत आरसीबीच्या विजयाच्या आशा ठेवल्या होत्या. तत्पूर्वी, धडाकेबाज सलामीवीर ब्रेंडन मॅक्क्युलम (४३) आणि विध्वंसक एबी डिव्हिलियर्स (४४) यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने २० षटकात ७ बाद १७६ धावांची आव्हानात्मक मजल मारली. मधली फळी कोलमडल्यानंतर मनदीप सिंगच्या फटकेबाजीमुळे आरसीबीने चांगली धावसंख्या गाठली. क्विंटन डीकॉक (४) झटपट परतल्यानंतर मॅक्क्युलमने आक्रमक पवित्रा घेतला. मॅक्क्युलम २७ चेंडूत ४३ धावा करुन परतल्यानंतर कोहलीने ३३ चेंडूत ३१ धावा केल्या. यामुळे आरसीबीच्या धावगतीला खीळ बसली. डिव्हिलियर्स (२३ चेंडूत ४४ धावा) व मनदीप सिंगमुळे (१८ चेंडूत ३७) आरसीबीने १७६ धावा उभारल्या.