IPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग

सेहवाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " ख्रिस गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवले आहे. "

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 05:55 PM2018-04-20T17:55:41+5:302018-04-20T17:55:41+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2018: we have save IPL as we took Chris Gayle in our team. | IPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग

IPL 2018 : गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवलं - सेहवाग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देप्रत्येक सामना खेळण्यासाठी मी उत्साही असतो. पंजाब हा माझ्यासाठी नवीन संघ आहे, पण क्रिकेट हे माझ्यासाठी नवीन नाही, असे गेल म्हणाला.

मोहाली : ख्रिस गेलने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएलच्या सामन्यात शतक झळकावले आणि तो चर्चेचा विषय ठरला. पण लिलावात मात्र गेलला कुणीही वाली ठरला नव्हता. अखेरच्या क्षणी किंग्ज इलेव्हन पंजाबने गेलला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. आता त्याला संघात घेऊन आयपीएलला वाचवले, असे वक्तव्य किंग्ज इलेव्हन पंजाबचा मुख्य मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागने केले आहे.


सेहवाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " ख्रिस गेलला संघात घेऊन आयपीएलला वाचवले आहे. " सेगवागने हे म्हणण्याचं कारण की, आतापर्यंत ज्याला कुणी आपल्या संघात घेत नव्हतं, त्याला आम्ही घेतलं आणि त्यानेच आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली. गेलनेही सेहवागच्या ट्विटवर सहमती दर्शवली आहे.


सेहवागच्या या ट्विटवर पंजाबच्या संघाने रीट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, " हिऱ्याची पारख जशी जवाहिराला असते, तशीच गेलची पारख वीरु यांना आहे. "

शतक झळकावल्यावर गेल म्हणाला की, " संघ कोणताही असो, मी शंभर टक्के कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक सामना खेळण्यासाठी मी उत्साही असतो. पंजाब हा माझ्यासाठी नवीन संघ आहे, पण क्रिकेट हे माझ्यासाठी नवीन नाही. मी जिथे खेळायला जातो तिथे दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. "

Web Title: IPL 2018: we have save IPL as we took Chris Gayle in our team.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.