ठळक मुद्देहा घडलेला प्रकार काही सेकंदामध्ये घडला असेल, पण यामधून धोनीच्या महानतेचा प्रत्यय येतो.
कोलकाता : खेळाडूला वयाचं बंधन नसतं, खेळाच्या रणांगणात एखादा खेळाडू जेवढा वेळ राहतो तेवढी त्याची महानता वृद्धिंगत होत जाते. महेंद्रसिंग धोनीही या गोष्टीला अपवाद नाही. याचाच प्रत्यय गुरुवारी झालेल्या आयपीएलच्या ईडन गार्डन्सच्या सामन्यातही आला.
ईडन गार्डन्सवर चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सामना रंगला होता, कोलकाताने नाणेफेक जिंकत चेन्नईला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले होते.
चेन्नईचे फलंदाज फटकेबाजी करत असताना धोनी ' डगआऊट 'मध्ये बसला होता. त्यावेळी काही आकडेवारी बघण्यासाठी त्याने आपली जागा सोडली आणि ' डगआऊट 'मध्ये लॅपटॉप घेऊन बसलेल्या सहाय्यकांकडे तो गेला. तो आकडेवारी पाहत असताना धोनीच्या जवळ एक तरुण आला आणि त्याने चक्क धोनीचे पाय धरले. हे सारे पाहून धोनीलाही थोडासा धक्का बसला. पण आपल्या स्वभावानुसार त्याने तसे दाखवले नाही. धोनीने त्या तरुणाच्या पाठीवरून हात फिरवला, जणू त्याला आशिर्वादच दिला. त्यानंतर सुरक्षारक्षक त्या तरुणाला तिथून घेऊन गेला. हा घडलेला प्रकार काही सेकंदामध्ये घडला असेल, पण यामधून धोनीच्या महानतेचा प्रत्यय येतो.
Web Title: IPL 2018: What did Dhoni, when fans touching his feet
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.