IPL 2018: पुन्हा रोहितची जादू चालणार ? काय आहे मुंबई इंडियन्सची ताकद?

कर्णधार रोहित शर्मा यावेळी काय कमाल करणार याची उत्सुकता वाढली आहे. चला जाणून घेऊया मुंबई इंडियन्स टीमची खासियत काय आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 11:23 AM2018-03-28T11:23:38+5:302018-03-28T11:23:38+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2018: Will Mumbai Indians will win Ipl again?What is the strength of Mumbai Indians? | IPL 2018: पुन्हा रोहितची जादू चालणार ? काय आहे मुंबई इंडियन्सची ताकद?

IPL 2018: पुन्हा रोहितची जादू चालणार ? काय आहे मुंबई इंडियन्सची ताकद?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमुंबईने लिलावात 22 खेळाडू विकत घेतले.7 ऑलराऊंडरना टीममध्ये सामिल केले आहे

आयपीएलच्या 11 व्या सीझनची सुरुवात होण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. सर्वच टीम तयारीला लागल्या आहेत. नेहमीप्रमाणे यावर्षीही मुंबई टीमकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कर्णधार रोहित शर्मा यावेळी काय कमाल करणार याची उत्सुकता वाढली आहे. चला जाणून घेऊया मुंबई इंडियन्स टीमची खासियत काय आहे. 

आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त तीन वेळा किताब आपल्या नावावर करणा-या मुंबई इंडियन्सने यावेळी एकूण 25 खेळाडूंना टीममध्ये जागा दिली आहे. मुंबईने लिलावात 22 खेळाडू विकत घेतले, तर रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह या तिघांना रिटेन करण्यात आले. तेच पाठीच्या ञासाने ग्रस्त असलेला वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडोर्फच्या जागी न्यूझीलंडच्या मिशेल मॅकलीनगनला संधी देण्यात आली आहे. मुंबई इंडियन टीममध्ये 8 परदेशी आणि 17 भारतीय खेळाडू आहेत.  

टीमला तिनदा चॅम्पियन करणारा कर्णधार -

रोहित शर्माकडे मुंबई इंडियन टीमचं नेतृत्व आहे. त्याने तीन वेळा टीमला चॅम्पियनचा किताब मिळवून दिला. हे करणारा तो एकुलता एक खेळाडू आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियनने 2013, 2015 आणि 2017 मध्ये किताब मिळवला होता. रोहितने आयपीएलमध्ये 159 सामन्यांमध्ये 130.89 च्या स्ट्राईक रेटने 4207 रन्स केले आहेत.

मुंबई इंडियन्सचे ऑलराऊंडर -

मुंबई इंडियन्स फ्रॅंचायजीने पांड्या बंधु आणि पोलार्ड सहीत 7 ऑलराऊंडरना टीममध्ये सामिल केले आहे. हे खेळाडू टीमला सगळ्याच गोष्टींसाठी फायद्याचे ठरतील. मुंबई टीममध्ये हार्दिक पांड्या, किरन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, बेन कटिंग, जेपी डुमिनी, तजिंदर ढिल्लन आणि अनुकूल रॉय या ऑलराऊंडर्सना संधी देण्यात आली आहे.

मुंबई इंडियन्स टीमचे फलंदाज -

मुंबई इंडियन्सची बॅटींग लाईन ही टीमची सर्वात मोठी ताकद आहे. टीममध्ये सूर्यकुमार यादव, ईविन लुईस, सौरभ तिवारी, शरद लुंबा आणि सिध्देश लाडसारखे फलंदाज घेण्यात आले आहे. टीममध्ये ईशान किशन आणि आदित्य तारे हे दोन विकेटकीपर फलंदाज आहेत. 

मुंबई इंडियन्स टीमचे गोलंदाज -

मुंबई इंडियन टीममध्ये गोलंदाजही चांगलेच धारदार आहेत. टीममध्ये जसप्रीत बुमराह, मुस्तफिजुर रहमान, पॅट कमिन्स, राहुल चहर, प्रदीप सांगवान, जेसन बेहरेनडॉफ, मयंक मार्कंडे, अखिला धनंजय, मोहसिन खान आणि निधीष यांना संधी देण्यात आली आहे.

Web Title: IPL 2018: Will Mumbai Indians will win Ipl again?What is the strength of Mumbai Indians?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.