नवी दिल्ली - फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला आर. अश्विनने ट्विटरच्या माध्यामातून एक इच्छा व्यक्त केली होती. सहा फेब्रुवारी 2018 रोजी अश्विनने पंजाब संघाचा कर्णधार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. अन् महिनाअखेरपर्यंत त्याची ती इच्छा पूर्ण झाली आहे. आयपीएलमधील पंजाब संघाच्या कर्णधारपदाची धुरा भारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विनकडे सोपवण्यात आली आहे.
आयपीएलच्या 11 व्या मोसमासाठी यावर्षी सर्वच खेळाडूंची बोली लावण्यात आली होती. बंगळुरुमध्ये झालेल्या लिलावात भारतीय संघातील अनुभवी अश्विनसाठी चेन्नई आणि पंजाबमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. शेवटी पंजाबनं मात करत अश्विनला खरेदी केलं. अश्विनसाठी पंजाबनं 7.6 कोटी रुपयांची बोली लावली. यापूर्वी अश्विने पुणे आणि चेन्नईच्या संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. पंजाब संघामध्ये आर. अश्निन, गेल, युवराज आणि डेविड मिलर कर्णधारपदाच्या शर्यतित होते. पण पंजाबने कर्णधारपदाची धुरा अश्विनकडे सोपवली आहे.
काय म्हणाला होता अश्विन -
तमिळनाडू संघाच्या कर्णधारपदाची मी जबाबदारी स्वीकारताना चांगली कामगीरी केली आहे. पण टी-20 प्रकारात मी संघाचे नेतृत्व केलेल नाही. जर मला पंजाब संघाकडून तशी ऑफर आली तर मी नक्कीच स्वीकारेन अशी इच्छा अश्विनने व्यक्त होती.
असा आहे पंजाब संघ -
अक्षर पटेल (6.75 कोटी), रविचंद्रन अश्विन (7.6 कोटी ), युवराज सिंह (2 कोटी), करुण नायर (5.6 कोटी), लोकेश राहुल (11 कोटी), डेविड मिलर (3 कोटी), एरॉन फिंच (6.2 कोटी), मार्कस स्टोइनिस (6.2 कोटी), मयंक अग्रवाल (1 कोटी), अंकित सिंह राजपूत (3 कोटी), एंड्रू टाई (7.2 कोटी), मुजीब जादरान (4 कोटी), मोहित शर्मा (2.4 कोटी, राइट टू मैच), बरिंदर सरां (2.2 कोटी), क्रिस गेल (2 कोटी), बेन ड्वौर्शुइस (1.4 कोटी), अक्षदीप नाथ (1 कोटी), मनोज तिवारी (1 कोटी), मंजूर डार, प्रदीप साहू, मयंक डागर (20-20 लाख)
Web Title: IPL 2018:R Ashwin to captain Kings XI Punjab in Indian Premier League 2018R Ashwin to captain Kings XI Punjab in Indian Premier League 2018
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.