चेन्नई, आयपीएल २०१९ : चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये यंदाच्या हंगामातील पहिला सामना रंगत आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होत आहे. पण या पहिल्या सामन्याचा अर्धशतकी योगायोग आहे. कारण या मैदानातील आयपीएलचा हा ५०वा सामना ठरला आहे.
आतापर्यंत या मैदानात ४९ सामने झाले आहे. या ४९ सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३१ सामने जिंकले आहेत. या सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा सामना धोनी जिंकणार की कोहली, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
सुरेश रैना-विराट कोहली यांच्यात शर्यत, कोण ठरणार कासव कोण ससा?
इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2019) 12 व्या मोसमाला आजपासून सुरुवात होत आहे. लोकसभा निडवणुकांमुळे आयपीएल स्पर्धा भारतात होणार की नाही, याबाबत संदिग्धता होती. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) आयपीएल भारतातच खेळवण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार वेळापत्रकही जाहीर केले. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल्स चॅलेंजर बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. या सामन्याच्या निमित्ताने महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे आमनेसामने येणार आहेत आणि त्याचीच सर्वांना अधिक उत्सुकता आहे. पण, या सामन्यात खरी शर्यत रंगणार आहे ती कोहली आणि सुरेश रैना यांच्यात... या दोघांनाही एक विक्रम खुणावत आहे आणि त्यात पहिली बाजी कोण मारणार, याची उत्सुकता लागली आहे.
या सामन्यात रैना व कोहली यांच्यात सर्वात प्रथम 5000 धावा करण्याची शर्यत रंगली आहे. आजच्या सामन्यात या दोघांपैकी कोण प्रथम 5000 धावा करणार यासाठी दोघेही आतुर आहेत. या शर्यतीत बाजी मारण्यासाठी रैनाला 15 धावांची गरज आहे, तर कोहलीला 52 धावांची गरज आहे. रैनाने 176 सामन्यांत 4985 धावा केल्या आहेत, तर कोहलीने 163 सामन्यांत 4948 धावा केल्या आहेत.
Web Title: IPL 2019: this is 50th IPL match in Chennai
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.