नवी दिल्ली, आयपीएल २०१९ : कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील शनिवारचा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. या सामन्यात कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना १८५ धावा केल्या होत्या, पण दिल्लीलाही १८५ धावांवर समाधान मानावे लागले आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
सुपर ओव्हरमध्ये दिल्लीला दहा धावा करता आल्या. यावेळी कोलकात्यापुढे सामना जिंकण्यासाठी 11 धावांचे आव्हान ठेवता आले होते. कोलकात्याच्या आंद्रे रसेलने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला. पण त्यानंतर दिल्लीच्या कागिसो रबाडाने एक अचूक चेंडू टाकला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर रबाडाने यॉर्कर टाकला आणि रसेलला त्रिफळाचीत केले. हा आयपीएलमधील सर्वोत्तम चेंडू असल्याचे मत भारताचे माजी कर्णधार आणि दिल्लीच्या संघाचे सल्लागार सौरव गांगुलीने सांगितले.
सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सनेकोलकाता नाईट रायडर्सवर विजय मिळवला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना कोलकात्यापुढे 11 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला तीन धावांनी पराभव पत्करावा लागला.
अखेरच्या षटकांमध्ये मोठे फटके मारण्याच्या नादात दिल्लीने आपले विकेट्स गमावले आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. कारण दोन्ही संघांच्या निर्धारीत 20 षटकांमध्ये 185 धावा झाल्या.
कोलकात्याच्या आव्हानाचा पाठलाग करतावा दिल्लीची चांगली सुरुवात झाली नाही. लामीवीर शिखर धवनला त्यांनी तिसऱ्या षटकातच गमावले. पण त्यानंतर पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांनी दमदार फलंदाजी करत 89 धावांची भागीदारी रचत संघाचा धावफलक हलता ठेवला. अय्यरने 32 चेंडूंत 43 धावांची खेळी साकारली. पृथ्वीने यावेळी दमदार फलंदाजी केली.
कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल पुन्हा एकदा तळपला. रसेलच्या धडाकेबाद अर्धशतकामुळे कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सपुढे धावांचे 186 आव्हान ठेवले. रसेलने 28 चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 62 धावांची तुफानी खेळी साकारली.
दिल्लीने नाणेफेक जिंकत कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दिल्लीचा हा निर्णय योग्य असल्याचे पहिल्या दहा षटकांमध्ये पाहायला मिळाले. कारण दिल्लीने कोलकात्याचा अर्धा संघ फक्त 61 धावांमध्ये गुंडाळला. पण त्यानंतर दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल यांनी कोलकात्याचा डाव सावरला.