हैदराबाद, आयपीएल २०१९ : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील अंतिम फेरीच्या सामन्यात पंचगिरीवरून काही वाद विवाद पाहायला मिळाले. पहिल्या डावात कायरन पोलार्ड पंचांवर भडकला होता. दुसऱ्या डावात धोनीच्या रनआऊटवरूनही पंच टीकेचे धनी ठरताना दिसत होते.
धोनी आऊट आहे की नाही, हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे देण्यात आला होता. धोनी दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता आणि त्यावेळी दुसरी धाव घेतना हा प्रसंग पाहायला मिळाला. धोनी दुसरी धाव घेत असताना इशान किशनने नॉन स्ट्राइक येथे असलेल्या स्टम्पवर थेट चेंडू मारला. त्यावेळी मैदानातील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सुपूर्द करण्यात आला होता. हा निर्णय कठिण असल्याचे समजले जात होते. त्यावेळी काहींना धोनी नॉट आऊट असल्याचे वाटत होते. पण तिसऱ्या पंचांनी धोनीला आऊट दिले आणि चेन्नईचे चाहते चांगलेच भडकले.
पोलार्ड असा राग काढणं बर नव्हं, पाहा हा व्हिडीओआयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सनेचेन्नई सुपर किंग्सपुढे १५० धावांचे आव्हान ठेवले. मुंबईला हे आव्हान चेन्नईपुढे ठेवता आले ते कायरन पोलार्डमुळेच. कारण पोलार्डने या सामन्यात २५ चेंडूंत नाबाद ४१ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच मुंबईला चेन्नईपुढे आव्हनात्मक धावसंख्या ठेवता आली. पण या सामन्यात पोलार्डच्या रागाचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला.
या सामन्याच्या अखेरच्या षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. हे षटक ड्वेन ब्राव्हो टाकत होता. या षटकातील तिसरा चेंडू वाईडच्या लाईनच्या बाहेर पडला. पण पंचांनी यावेळी वाईड दिला नाही. त्यावेळी पोलार्ड चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. पोलार्डने बॅट हातातून उंच उडवली. त्यानंतर चेंडूचा सामना करण्यासाठी पोलार्ड वाईडच्या लाईनजवळ जाऊन उभा राहिला आणि त्याने चेंडू खेळण्यास नकार दिला. त्यावेळी दोन्ही पंचांना पोलार्डची समज काढली आणि सामना सुरु झाला.
पाहा हा व्हिडीओ
फायनलमधली ही भन्नाट कॅच पाहायलाच हवी, पाहा व्हिडीओ...आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सपुढे १५० धावांचे आव्हान ठेवले. या सामन्यात एक भन्नाट कॅच पाहायला मिळाली. ही कॅच आपल्याच गोलंदाजीवर पकडली ती चेन्नईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने.
मुंबईचे फलंदाज संयतपणे फलंदाजी करत होता. यावेळी कृणाल पंड्या खेळत होता. शार्दुलने एक बाऊन्सर पंड्याच्या दिशेने टाकला. पंड्याला हा चेंडू व्यवस्थित खेळता आला नाही आणि हा चेंडू हवेत उडाला. त्यावेळी शार्दुलने धावत जात अफलातूल झेल पकडला.
हा पाहा व्हिडीओ