मुंबई, आयपीएल २०१९ : आयपीएलचा ज्वर चांगलाच चढलेला आहे. त्याचबरोबर खेळाडूंच्या दुखापतीही समोर येत आहे. मुंबई इंडियन्सलाही असाच एक धक्का बसल्याचे म्हटले जात असून त्यानंतर एक नवीन पाहुणा मुंबईच्या संघात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
इंडियन प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. आयपीएल पदार्पणातच विक्रमी कामगिरी करणारा मुंबईचा गोलंदाज अल्झारी जोसेफ दुखापतग्रस्त झाला असून तो उर्वरीत आयपीएल स्पर्धेला मुकण्याची शक्यता बळावली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अल्झारीच्या उजव्या हाताला दुखापत झाली. चेंडू अडवताना अल्झारीने डाईव्ह मारली आणि त्यात त्याने दुखापत करून घेतली.
काही दिवसांपूर्वी मुंबईचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ हा जायबंदी झाला होता. अल्झारीच्या खांद्याला जबर दुखापत झाल्याचे म्हटले गेले. संघातील सूत्रांनी आता जोसेफ आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मुंबई इंडियन्सने दिलेली नाही. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना अल्झारीच्या उजव्या हाताला दुखापत झाली. चेंडू अडवताना अल्झारीने डाईव्ह मारली आणि त्यात त्याने दुखापत करून घेतली.
पदार्पणाच्या सामन्यातच अल्झारीने 12 धावांत घेतलेल्या 6 बळींच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सनराजर्स हैदराबादवर 40 धावांनी मात केली. दुखापतग्रस्त अॅडम मिल्नेच्या जागी बदली खेळाडू म्हणून अल्झारी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला. पहिल्याच सामन्यात त्याने सोहेल तन्वीरच्या नावावर असलेला विक्रम मोडला. तन्वीरने 2008मध्ये 14 धावांत 6 बळी घेतले होते. त्याचा विक्रम १२ वर्षांनी अल्झारीने मोडला. तन्वीरने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध हा विक्रम केला होता.