आयपीएल 2019 : अल्झारी जोसेफच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनेसनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला.
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 136 धावा करता आल्या होत्या. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग हैदराबादला करता आला नाही आणि मुंबईने 40 धावांनी दमदार विजय मिळवला. अल्झारीने भेदक मारा करत फक्त 12 धावांमध्ये सहा धावा केल्या. हैदराबादचा संघ यावेळी 96 धावांवर तंबूत परतला.
सनरायझर्स हैदराबादच्या भेदक गोलंदाजीपुढे मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. किरॉन पोलार्डने अखेरच्या षटकांमध्य जोरदार फटकेबाजी केल्यामुळे मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. पोलार्डने अखेरच्या षटकांमध्ये दमदार फटकेबाजी केली. पोलार्डने 26 चेंडूंत नाबाद 46 धावा केल्या, त्यामुळे मुंबईला 136 धावा करता आल्या.
हैदराबादने नाणेफेक जिंकत मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केले. कर्णधाराचा हा निर्णय योग्य असल्याचे हैदराबादच्या गोलंदाजांनी दाखवून दिले. मुंबईला सातत्याने धक्के देत हैदराबादच्या गोलंदाजांनी मुंबईच्या धावसंख्येला वेसण घालण्याचे काम चोख बजावले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला शून्यावर असताना जीवदान मिळाले होते. पण रोहितलाही यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. रोहितला 11 धावांवर समाधान मानावे लागले. रोहित बाद झाल्यानंतर मुंबईच्या एकाही फलंदाजाला जास्त काळ खेळपट्टीवर तग धरून राहता आले नाही.