Join us  

IPL 2019 : ... अन् त्या चोराला पकडायला पोलीस थेट स्टेटियममध्येच घुसतात तेव्हा

वॉटसनचा एक षटकार यावेळी थेट प्रेक्षकांमध्ये गेला आणि त्यानंतर चोर-पोलीसांचा खेळ सुरु झाल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 6:05 PM

Open in App

आयपीएल 2019 : मंगळवारी चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये आयीएलचा सामना झाला. या सामन्यात चोर-पोलीसांचा खेळ पाहायला मिळाला. कारण या सामन्यात एका चोराला पकडायला पोलीस थेट स्टेडियममध्ये घुसल्याचे पाहायला मिळाले.

चेन्नईचा संघ फलंदाजी करत असताना ही गोष्ट पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने 147 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या शेन वॉटसनने दिल्लीच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. वॉटसनचा एक षटकार यावेळी थेट प्रेक्षकांमध्ये गेला आणि त्यानंतर चोर-पोलीसांचा खेळ सुरु झाल्याचे पाहायला मिळाले.

ही गोष्ट घडली ती अमित मिश्राच्या सातव्या षटकामध्ये. मिश्राच्या सातव्या षटकातील चौथ्या चेंडूवर वॉटसनने षटकार लगावला. हा षटकार थेट प्रेक्षकांमध्ये गेला. त्यावेळी प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर प्रेक्षकांनी हा चेंडू मैदानात पुन्हा दिला नाही. त्यावेळी पंचांनी नवीन चेंडू मागवला आणि खेळ सुरु केला. त्यानंतर वॉटसनने जिथे षटकार मारला होता पोलीसांना ज्याने चेंडूचा तपास करायला सुरुवात केली. हा चेंडू कोणी चोरला हे एका व्हिडीओमध्ये कैद झाले असून त्या चोराला पोलीसांनी चांगलाच धडा शिकवल्याचे पाहायला मिळाले.

चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सवर सहा विकेट्स राखत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीच्या संघाला १४७ धावा करता आल्या. हा सामना अंतिम षटकापर्यंत गेला असला तरी चेन्नईच हा सामना जिंकेल, अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली होती. चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या धावा आटल्या. ड्वेन ब्राव्होने भेदक मारा करत दिल्लीच्या तीन फलंदाजांना बाद केले आणि त्यांचे कंबरडे मोडले. चेन्नईच्या अचूक गोलंदाजीमुळे दिल्लीला 147 धावांवर समाधान मानावे लागले. शिखर धवनने अर्धशतक झळकावल्यामुळे दिल्लीला ही मजल मारता आली.

टॅग्स :आयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्स