नवी दिल्ली, आयपीएल 2019 : कोलकाता नाइट रायडर्सच्या आंद्रे रसेलने शनिवारी इंडियन प्रीमिअर लीगमधील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात विक्रमाला गवसणी घातली. त्याच्या विक्रमी खेळीनंतरही कोलकाताला सुपर ओव्हरमध्ये दिल्लीकडून पराभव पत्करावा लागला. त्यानं या सामन्यात विक्रम नावावर करताना वीरेंद्र सेहवाग, रिषभ पंत आणि ग्लेन मॅक्सवेल यांना मागे टाकले.
रसेलने 28 चेंडूंत 4 चौकार व 6 षटकार खेचून 62 धावा चोपल्या. फिरोज शाह कोटला येथे झालेल्या या सामन्यात त्यानं 221.43 च्या सरासरीनं फटकेबाजी केली. आयपीएलमधील त्याचे हे पाचवे अर्धशतक ठरले, त्याशिवाय त्यानं आयपीएलमध्ये 1000 धावांचा पल्लाही पार केला. विशेष म्हणजे त्याने 42 सामन्यांत हा पल्ला पार केला आणि अशी कामगिरी करणाऱ्या 66 फलंदाजांमध्ये आपले नाव समाविष्ट केले.
रसेलने 1000 धावा करण्यासाठी 545 चेंडूंचा सामना केला. त्यानं 183.69 च्या स्ट्राईक रेटने या धावा चोपल्या आणि आयपीएलच्या इतिहासात यापेक्षा अधिक स्ट्राईक रेटने 1000 धावा कोणालाही करता आल्या नाही. रसेलनं या विक्रमासह ख्रिस गेल, सेहवाग, मॅक्सवेल आणि पंतलाही मागे टाकले.
रसेल थोडक्यात बचावला; Videoकोलकाता नाईट रायडर्सच्या आंद्रे रसेलच्या आतषबाजीनं पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रसेलची बॅट चांगलीच तळपली, परंतु सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या या सामन्यात कोलकाताला हार मानावी लागली. रसेलच्या धडाकेबाद अर्धशतकामुळे कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सपुढे धावांचे 186 आव्हान ठेवले.
रसेलने 28 चेंडूंत चार चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 62 धावांची तुफानी खेळी साकारली. पण, सामन्यात एक क्षण असा आला की, कोलकाताच्या खेळाडूंचा काळजाचा ठोका चुकला होता. चौकार - षटकारांची आतषबाजी करणारा रसेल खेळपट्टीवर वेदनेनं कळवळताना दिसला. पण, 14 व्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर चेंडू आद्रे रसेलच्या खांद्यावर आदळला आणि तो जमिनीवर लोळू लागला. त्यामुळे सामन्यातील वातावरण गंभीर झाले होते. पण, अवघ्या काही मिनिटांत रसेल उभा राहिला... त्यानंतर रसेल वादळ घोंगावलं.
पाहा व्हिडीओ..