मुंबई : लोकसभा निवडणुकींच्या तारखा जाहीर झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) संपूर्ण वेळापत्रकाची उत्सुकता होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) मंगळवारी आयपीएलच्या साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्यानुसार प्रत्येक संघ घरच्या मैदानावर किमान सात सामने खेळणआर आहे. निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी, बीसीसीआयनं आयपीएलच्या पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर केलं होतं.
भारतात लोकसभा निवडणुका 11 एप्रिल ते 19 मे या कालावधीत सात टप्प्यात होणार आहे. त्यामुळे आयपीएलचे सामने वेगळ्या शहरांमध्ये खेळवण्याची शक्यता निर्माण झाली होती. विशेषतः मुंबई आणि कोलकाता या प्रमुख शहरांतील सामने हलवण्यात येतील, अशी चर्चा होती. पण, बीसीसीआयनं हे सामने प्रमुख शहरांतच खेळवण्याची तारेवरची कसरत पार केली. बीसीसीआयने मंगळवारी जाहीर केलेल्या वेळापत्रकात साखळी सामन्यांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात उद्धाटनीय सामना होणार आहे. 23 मार्च ते 5 मे या कालावधीपर्यंचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्ले ऑफ, एलिमिनेटर आणि अंतिम सामन्याच्या तारखा यात जाहीर करण्यात आलेल्या नाही. पण, 12 मे ला अंतिम सामना होण्याची शक्यता आहे.
असे होतील साखळी फेरीचे सामने
23 मार्च : चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू, चेन्नई
24 मार्च : कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता
मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई
25 मार्च : राजस्थान रॉयल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, जयपूर
26 मार्च : दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली
27 मार्च : कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता
28 मार्च : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू
29 मार्च : सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स, हैदराबाद
30 मार्च : किंग्स इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स, मोहाली
दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली
31 मार्च : सनराइझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, हैदराबाद
चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, चेन्नई
1 एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. दिल्ली कॅपिटल्स, मोहाली
2 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चैलेंजर्स बंगळुरू, जयपूर
3 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई
4 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. सनराइझर्स हैदराबाद, दिल्ली
5 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू
6 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, चेन्नई
सनराइझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद
7 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू
राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, जयपूर
8 एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. सनराइझर्स हैदराबाद, मोहाली
9 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, चेन्नई
10 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई
11 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, जयपूर
12 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता
13 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई
किंग्स इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मोहाली
14 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता
सनराइझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स, हैदराबाद
15 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई
16 एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स, मोहाली
17 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, हैदराबाद
18 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली
19 एप्रिल : कोलकाता नाइट राइडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता
20 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, जयपूर
दिल्ली कॅपिटल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, दिल्ली
21 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट राइडर्स, हैदराबाद
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू
22 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, जयपूर
23 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. सनराइझर्स हैदराबाद, चेन्नई
24 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. किंग्स इलेव्हन पंजाब, बंगळुरू
25 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. राजस्थान रॉयल्स, कोलकाता
26 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई
27 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. सनराइझर्स हैदराबाद, जयपूर
28 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली
कोलकाता नाईट राइडर्स वि. मुंबई इंडियन्स, कोलकाता
29 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. किंग्स इलेव्हन पंजाब, हैदराबाद
30 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स, बंगळुरू
1 मे : चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई
2 मे : मुंबई इंडियन्स वि. सनराइझर्स हैदराबाद, मुंबई
3 मे : किंग्स इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाईट राइडर्स, मोहाली
4 मे : दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स, दिल्ली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनराइझर्स हैदराबाद, बंगळुरू
5 मे : किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स , मोहाली
मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, मुंबई
Web Title: IPL 2019: BCCI announces schedule for league stage of Indian Premier League 2019
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.