हैदराबाद, आयपीएल २०१९ : आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नई सुपर किंग्सवर फक्त एका धावेने विजय मिळवला. पण या फाययनलचा टर्निंग पॉइंट हा शेन वॉटसनचा रन आऊट असल्याचे चाहत्यांना वाटले. शेन अखेरच्या षटकात दुसरी धाव घेताना आऊट झाला आणि तिथेच सामना फिरल्याचे म्हटले गेले.
मुंबईच्या १५० धावांच्या आव्हानाचा पाढलाग करताना चेन्नईची चांगली सुरुवात झाली. पण कालांतराने त्यांनी ठराविक फरकाने फलंदाज गमावले. पण यावेळी अपवाद ठरला तो शेन वॉटसन. आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी न करू शकलेल्या वॉटसनने धडाकेबाज फटकेबाजी करत चेन्नईचे आव्हान जीवंत ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना वॉटसनने अर्धशतक झळकावले.
अखेरच्या षटकांमध्ये कायरन पोलार्डने धडाकेबाज फलंदाजी केली. त्यामुळेच आयपीएलच्या अंतिम फेरी मुंबई इंडियन्सलाचेन्नई सुपर किंग्सपुढे 150 धावांचे आव्हान ठेवता आले. चेन्नईकडून दीपक चहरने भेदक मारा करत तीन फलंदाजांना बाद केले. इम्रान ताहिर आणि शार्दुल ठाकूर यांनी यावेळी दोन विकेट्स मिळवत चहरला चांगली साथ दिली.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईने धडाकेबाज सुरुवात केली असली तरी रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक बाद झाल्यावर त्यांची धावगती थोडीशी मंदावली. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी मुंबईला स्थैर्य मिळवून द्यायचा प्रयत्न केला, पण त्यांना यामध्ये अपयश आले. कृणाल पंड्यालाही जास्त धावा करता आल्या नाहीत.
मुंबईचा अर्धा संघ माघारी परतला खरा, पण त्यानंतर कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्या यांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. पंड्याला यावेळी पाच धावांवर जीवदान सुरेश रैनाने दिले. पण या जीवदानाचा फायदा पंड्याला उचलता आला नाही. पंड्या १६ धावांवर बाद झाला.
धोनीच्या रनआऊटनंतर पंचगिरीवर पुन्हा प्रश्नचिन्ह?मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील अंतिम फेरीच्या सामन्यात पंचगिरीवरून काही वाद विवाद पाहायला मिळाले. पहिल्या डावात कायरन पोलार्ड पंचांवर भडकला होता. दुसऱ्या डावात धोनीच्या रनआऊटवरूनही पंच टीकेचे धनी ठरताना दिसत होते.
धोनी आऊट आहे की नाही, हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे देण्यात आला होता. धोनी दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होता आणि त्यावेळी दुसरी धाव घेतना हा प्रसंग पाहायला मिळाला. धोनी दुसरी धाव घेत असताना इशान किशनने नॉन स्ट्राइक येथे असलेल्या स्टम्पवर थेट चेंडू मारला. त्यावेळी मैदानातील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सुपूर्द करण्यात आला होता. हा निर्णय कठिण असल्याचे समजले जात होते. त्यावेळी काहींना धोनी नॉट आऊट असल्याचे वाटत होते. पण तिसऱ्या पंचांनी धोनीला आऊट दिले आणि चेन्नईचे चाहते चांगलेच भडकले.
पोलार्ड असा राग काढणं बर नव्हं, पाहा हा व्हिडीओआयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सपुढे १५० धावांचे आव्हान ठेवले. मुंबईला हे आव्हान चेन्नईपुढे ठेवता आले ते कायरन पोलार्डमुळेच. कारण पोलार्डने या सामन्यात २५ चेंडूंत नाबाद ४१ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच मुंबईला चेन्नईपुढे आव्हनात्मक धावसंख्या ठेवता आली. पण या सामन्यात पोलार्डच्या रागाचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला.
या सामन्याच्या अखेरच्या षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. हे षटक ड्वेन ब्राव्हो टाकत होता. या षटकातील तिसरा चेंडू वाईडच्या लाईनच्या बाहेर पडला. पण पंचांनी यावेळी वाईड दिला नाही. त्यावेळी पोलार्ड चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. पोलार्डने बॅट हातातून उंच उडवली. त्यानंतर चेंडूचा सामना करण्यासाठी पोलार्ड वाईडच्या लाईनजवळ जाऊन उभा राहिला आणि त्याने चेंडू खेळण्यास नकार दिला. त्यावेळी दोन्ही पंचांना पोलार्डची समज काढली आणि सामना सुरु झाला.
पाहा हा व्हिडीओ