IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला धक्का

IPL 2019 : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 03:48 PM2019-04-13T15:48:10+5:302019-04-13T15:53:25+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 : Ben Stokes is injured, Liam Livingstone is playing in RR side against MI match | IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला धक्का

IPL 2019 : मुंबई इंडियन्सचा सामना करण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सला धक्का

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज वानखेडे स्टेडियमवर सामना होणार आहे. मुंबईने सलग तीन सामन्यांत विजय मिळवले आहेत. किरॉन पोलार्ड हा त्यांचा हुकुमी एक्का ठरत आहे. त्यात रोहित शर्माच्या पुनरागमनाने मुंबईची बाजू अधिक भक्कम झाली आहे. दुसरीकडे राजस्थानचा चेन्नई सुपर किंग्सकडून निसटता पराभव पत्करावा लागला. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत मुंबईला फलंदाजीचे आमंत्रण दिले. 

आव्हान टिकवण्यासाठी संघर्ष करत असलेल्या राजस्थानला या सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. त्यांचा प्रमुख खेळाडू बेन स्टोक्सला दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकावे लागले आहे. बेन स्टोक्सच्या जागी संघात इंग्लंडच्या लिएम लिव्हिंगस्टोनला संधी देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या लिएमने पाकिस्तान सुपर लीगमध्ये पदार्पणाच्या सामन्यात 43 चेंडूंत 82 धावा चोपल्या होत्या. ट

राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे, जोस बटलर, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, राहुल त्रिपाठी, लिअॅम लिव्हिंगस्टोन, कृष्णप्पा गौथम, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, जयदेव उनाडकत, धवल कुलकर्णी
मुंबईचा संघ : रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जोसेफ अल्झारी, राहुल चहर, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह

  • दोन्ही संघ आतापर्यंत 21 वेळा एकमेकांसमोर आले आणि मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 11 विजय मिळवले आहेत, तर राजस्थानच्या खात्यात 9 विजय आहेत.
  • मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने सहा, तर राजस्थानला दोनच विजय मिळवता आले आहेत.  
  • मुंबई इंडियन्सविरुद्ध संजू सॅमसनची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने मुंबईविरुद्ध 385 धावा केल्या आहेत. तर पोलार्डने राजस्थानविरुद्ध 335 धावा केल्या आहेत.
  • पोलार्डने राजस्थानविरुद्ध सर्वाधिक 14 विकेट घेतल्या आहेत, तर राजस्थानच्या धवल कुलकर्णीनं यजमानांविरुद्ध 8 विकेट घेतल्या आहेत. 
     

Web Title: IPL 2019 : Ben Stokes is injured, Liam Livingstone is playing in RR side against MI match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.