बंगळुरू, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने बुधवारी विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. पण या आनंदाच्या क्षणानंतर आरसीबीला एक वाईट बातमी समजली आहे. आरसीबीचा एक स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे आणि यापुढील आयपीएलच्या सामन्यांमध्ये त्याला खेळता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीला चांगली सुरुवात करता आली नाही. आरसीबीला पहिल्या सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. पण त्यानंतर मात्र त्यांनी विजय मिळवले आहेत. आता संघाची गाडी रुळावर येत असताना आरसीबीला मात्र मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचा एक महत्वाचा खेळाडू जायबंदी झाला आहे.
आरसीबीचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन हा दुखापतग्रस्त झाला आहे. दुसऱ्या सामन्यानंतर स्टेनच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर स्टेनची वैद्यकीय चाचणी केली आणि ही दुखापत गंभीर असल्याचे समजले. त्यानंतर मात्र स्टेनने विश्वचषकासाठी आयपीएलमधून काढता पाय घेतला आहे.
एबी डि'व्हिलियर्सची तुफानी खेळी आणि गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या गोलंदाजीमुळे बंगळुरुला विजय मिळवता आला. एबी डि'व्हिलियर्सच्या झंझावाती फलंदाजीमुळे आरसीबीला प्रथम फलंदाजी करताना 202 धावा करता आल्या. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग पंजाबला करता आला नाही. आरसीबीने हा सामना 17 धावांनी जिंकला. आरसीबीने पंजाबवर मात करत विजयी हॅट्रिक साजरी केली.
आरसीबीच्या 203 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या ख्रिस गेल आणि लोकेश राहुल या दोघांनीही आक्रमक सुरुवात केली. पण या दोघांनाही मोठी खेळी साकारता आली नाही. त्यानंतर लिकोलस पुरन आणि डेव्हिड मिलर यांची जोडी चांगली जमली.
एबी डि'व्हिलियर्सच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला किंग्ज इलेव्हन पंजाबपुढे 203 धावांचे आव्हान ठेवता आले. डि'व्हिलियर्सने यावेळी 44 चेंडूंत तीन चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद 82 धावा केल्या.
पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली आणि पार्थिव पटेल यांनी आक्रमक सुरुवात केली. पण कोहलीला यावेळी जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. कोहली 13 धावा करून बाद झाला. त्यानंतर पटेल आणि डि'व्हिलियर्स यांची चांगलीच जोडी जमली. पण पटेलला अर्धशतक झळकावण्यात अपयश आले. पटेल बाद झाल्यावर आरसीबीची मधली फळी कोसळली. यावेळी डि'व्हिलियर्सने संघाला सावरले आणि आपले अर्धशतक पूर्ण केले.
डि'व्हिलियर्सने एका हाताने फटका मारला आणि चेंडू स्टेडियमबाहेर गेला
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा डाव यावेळी सावरला तो एबी डि'व्हिलियर्सने. डि'व्हिलियर्सने 44 चेंडूंत तीन चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद 82 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या खेळीमध्ये डि'व्हिलियर्सने चक्क एका हाताने षटकार मारला आणि हा चेंडू थेट स्टेडियमबाहेर गेल्याचे पाहायला मिळाले.
ही गोष्ट घडली सामन्याच्या 19व्या षटकात. मोहम्मद शमी हे षटक टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर डि'व्हिलियर्सने एक फटका मारला. त्यानंतर तो चेंडू थेट स्टेडियमबाहेर गेल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: IPL 2019: big shock to RCB, 'this' star player will lose IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.